खामगाव तालुक्यात रेतीअभावी घरकुलाचे काम थांबले 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2019 01:46 PM2019-01-21T13:46:04+5:302019-01-21T13:46:27+5:30

बोरी अडगाव ( खामगाव) : परिसरात रेती अभावी घरकुल योजनेचे काम थांबले असल्याची वास्तविकता आहे. यामुळे लाभार्थी विवंचनेत पडले आहेत. खामगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात घरकुलाची कामे सुरु आहेत.

In Khamgaon taluka the work of the house was stopped due to lack of sand | खामगाव तालुक्यात रेतीअभावी घरकुलाचे काम थांबले 

खामगाव तालुक्यात रेतीअभावी घरकुलाचे काम थांबले 

Next

बोरी अडगाव ( खामगाव) : परिसरात रेती अभावी घरकुल योजनेचे काम थांबले असल्याची वास्तविकता आहे. यामुळे लाभार्थी विवंचनेत पडले आहेत. खामगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात घरकुलाची कामे सुरु आहेत. रेतीचा पुरवठा बंद असल्याने शासकीय घरकुल योजनेची कामे तथा वैयक्तिक बांधकामे ठप्प झाली आहे.  शासकीय काम असल्यामुळे वेळेत पूर्ण करणे गरजेचे आहे अन्यथा घरकुल लाभार्थ्यांना आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. पुढील काही महिन्यात उन्हाच्या झळा सुरू होतील. त्यापूर्वी घरकूलाची निर्मिती होणे गरजेचे आहे मात्र रेती नसल्याने घरकूल बांधकाम थांबली आहेत. काही लाभार्थी रेतीसाठी जास्त पैसे मोजायलाही तयार आहेत. शिवाय पाण्याचाही प्रश्न आगामी काळात उपलब्ध होवू शकतो. त्यामुळे लवकरात लवकर रेती उपलब्ध करून देण्याची मागणी लाभार्थ्यांनी केली आहे. वेळेत पाणी व रेती न मिळाल्यास तालुक्यातील घरकूलांचे काम थांबण्याची शक्यता आहे. 

  रेती मिळाली नसल्याने घरकूल बांधकाम करण्यास अडचण निर्माण झाली आहे. गटविकास अधिकाºयांनी पुढाकार घेवून रेती उपलब्ध करून देण्याची लाभार्थ्यांची मागणी आहे.

- अनिल आखरे, उपसरंपच, बोरी. 

 खामगाव तालुक्यात घरकुलाचे काम सुरु आहे. रेती मुळे बांधकाम थांबले अशी अद्याप लाभार्थ्यांकडून तक्रार प्राप्त झाली नाही.

- के.डी.शिंदे, गटविकास अधिकारी, खामगाव

Web Title: In Khamgaon taluka the work of the house was stopped due to lack of sand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.