#खामगाव कृषि महोत्सव : आधुनिक सिंचनाचा वापर करा - ए. जे. अग्रवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2018 01:17 AM2018-02-19T01:17:52+5:302018-02-19T01:18:00+5:30

खामगाव: शेतीतील उत्पादन वाढविताना सिंचन व्यवस्थापनाकडे लक्ष देणे गरजेचे आहे. त्यासाठी शेतात पाणी मुरवले पाहिजे. विहीर, बोअरवेलचे पुनर्भरण करावे. त्याचबरोबरच पाण्याची बचत करण्यासाठी आधुनिक सिंचन पद्धतीचाही वापर करावा, असे आवाहन ए.जे. अग्रवाल यांनी केले.

# Khamgaon Krishi Mahotsav: Use modern irrigation - A. J. Agarwal | #खामगाव कृषि महोत्सव : आधुनिक सिंचनाचा वापर करा - ए. जे. अग्रवाल

#खामगाव कृषि महोत्सव : आधुनिक सिंचनाचा वापर करा - ए. जे. अग्रवाल

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: शेतीतील उत्पादन वाढविताना सिंचन व्यवस्थापनाकडे लक्ष देणे गरजेचे आहे. त्यासाठी शेतात पाणी मुरवले पाहिजे. विहीर, बोअरवेलचे पुनर्भरण करावे. त्याचबरोबरच पाण्याची बचत करण्यासाठी आधुनिक सिंचन पद्धतीचाही वापर करावा, असे आवाहन ए.जे. अग्रवाल यांनी केले. ते येथील कृषी महोत्सवामध्ये ‘आधुनिक सिंचन सुविधा व त्याची देखभाल’ या विषयावर आयोजित मार्गदर्शन सत्रात बोलत होते. पुढे बोलताना अग्रवाल म्हणाले की, शेतीला पाणी देताना ठिबक सिंचन वापरल्यास पाण्याची मोठी बचत करता येईल. ठिबक सिंचनामुळे शेतीच्या उत्पादनात वाढ होऊन जमीन खराब होणार नाही. ठिबक सिंचनाद्वारे खत देण्याची पद्धतसुद्धा वापरता येईल. युरिया, फॉस्फरस अँसिड यासारखे विरघळणारे घटक ठिबक सिंचनाच्या साहाय्याने देता येतील, त्यामुळे शेतकर्‍यांनी ठिबक सिंचनाचा पुरेपूर वापर करावा, असे आवाहन ए.जे. अग्रवाल यांनी केले. 

Web Title: # Khamgaon Krishi Mahotsav: Use modern irrigation - A. J. Agarwal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.