#खामगाव कृषि महोत्सव : सीताफळ नाशवंत नसून ‘यशवंत’ फळ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2018 09:14 PM2018-02-18T21:14:16+5:302018-02-18T21:15:27+5:30

बुलडाणा जिल्ह्यातही सीताफळाचे उत्पादन चांगले आहे. मात्र आजही अनेक शेतकरी सीताफळ नाशवंत पीक समजून त्याकडे दुर्लक्ष करतात. परंतू सीताफळ हे नाशवंत पीक नसून ते शेतक-यांसाठी ‘यशवंत’ आहे, असे मत सीताफळ जानेफळ येथील शेतकरी उत्पादक कंपनीचे संचालक रमेश निकस यांनी व्यक्त केले. 

# Khamgaon Krishi Mahotsav: Sitafal is not a perishable and 'Yashwant' fruit! | #खामगाव कृषि महोत्सव : सीताफळ नाशवंत नसून ‘यशवंत’ फळ!

#खामगाव कृषि महोत्सव : सीताफळ नाशवंत नसून ‘यशवंत’ फळ!

Next
ठळक मुद्देशेतकरी उत्पादक कंपनीचे संचालक रमेश निकस यांचे मत 

लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव :  सीताफळ हे पीक सन १९८४ मध्ये जंगलातून शेतीमधील फळबागेत आले. महाराष्ट्रातील हवामान या पीकास पोषक असल्याने सीताफळाचे उत्पादन महाराष्ट्रात चांगल्या प्रकारे येवू शकते. तसेच बुलडाणा जिल्ह्यातही सीताफळाचे उत्पादन चांगले आहे. मात्र आजही अनेक शेतकरी सीताफळ नाशवंत पीक समजून त्याकडे दुर्लक्ष करतात. परंतू सीताफळ हे नाशवंत पीक नसून ते शेतक-यांसाठी ‘यशवंत’ आहे, असे मत सीताफळ जानेफळ येथील शेतकरी उत्पादक कंपनीचे संचालक रमेश निकस यांनी व्यक्त केले. 
खामगाव येथील कृषी महोत्सवात ‘सीताफळ शेती व भविष्य वेध’या विषयावर मार्गदर्शन सत्रात ते बोलत होते. पुढे बोलताना रमेश निकस म्हणाले की, सीताफळाचे एका एकरातून १५ हजारापासून अडीच हजार रुपयांचे उत्पादन घेता येवू शकते. आक्टोबर ते नोव्हेंबर या महिन्यात पाण्याचा ताण पडू देवू नये, तसेच उन्हाळ्यातील दिवसात हे पीक विश्रांतीच्या अवस्थेत असते. त्यामुळे उन्हाळ्यात या पीकाला जास्त पाण्याची गरज भासत नाही. सीताफळाचे भाव कमी झाल्यास सीताफळाचा गर काढून शेतक-यांना आर्थिक फायदा चां गला होऊ शकतो. जूनमध्ये रसशोषण करणारी कीड सीताफळावर येते. त्यामुळे त्यावर वेळीच कीडनाशक औषधांची फवारणी दोन वेळा करावी. सीताफळामध्ये चार वर्षानंतर कुठलेही आंतरपीक घेवू नाही, त्यामुळे सीताफळाच्या उत्पादनात वाढ होईल, असेही रमेश निकस यांनी यावेळी सांगितले.

Web Title: # Khamgaon Krishi Mahotsav: Sitafal is not a perishable and 'Yashwant' fruit!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.