#खामगाव कृषी महोत्सव : ‘सिद्धिविनायक’च्या विद्यार्थ्यांनी तयार केले बहुपयोगी फवारणी यंत्र!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2018 01:39 AM2018-02-18T01:39:42+5:302018-02-18T01:39:49+5:30

खामगाव: सिद्धिविनायक टेक्निकल कॅम्पसमधील स्कूल ऑफ इंजिनियरिंग  अँन्ड रिसर्च टेक्नॉलॉजी, शेगावच्या विद्यार्थ्यांनी बहुपयोगी फवारणी यंत्राची निर्मि ती केली असून, त्यांचे यंत्र कृषी महोत्सवाचे आकर्षण ठरले आहे.

# Khamgaon Krishi Mahotsav: Multi-purpose spraying machine made by Siddhivinayak students! | #खामगाव कृषी महोत्सव : ‘सिद्धिविनायक’च्या विद्यार्थ्यांनी तयार केले बहुपयोगी फवारणी यंत्र!

#खामगाव कृषी महोत्सव : ‘सिद्धिविनायक’च्या विद्यार्थ्यांनी तयार केले बहुपयोगी फवारणी यंत्र!

Next
ठळक मुद्देफवारणी यंत्र ठरत आहे कृषी महोत्सवाचे आकर्षण

लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: सिद्धिविनायक टेक्निकल कॅम्पसमधील स्कूल ऑफ इंजिनियरिंग  अँन्ड रिसर्च टेक्नॉलॉजी, शेगावच्या विद्यार्थ्यांनी बहुपयोगी फवारणी यंत्राची निर्मिती केली असून, त्यांचे यंत्र कृषी महोत्सवाचे आकर्षण ठरले आहे. स्कूल ऑफ  इंजिनियरिंग अँन्ड रिसर्च टेक्नॉलॉजी, शेगाव येथील मॅकेनिकल इंजिनियरिंगच्या  अंतिम वर्षाला शिकणारे गणेश गळस्कारण अंकित खोंदले, कृष्णा मोरखडे, अ तुल रावणकार, निशिकांत बोंडे आणि प्रकल्प मार्गदर्शक अनुप गावंडे यांनी संस् थाध्यक्ष सागर फुंडकर यांच्या मार्गदर्शनात हे बहुपयोगी फवारणी यंत्र तयार केले  आहे. 
यंत्रामध्ये त्यांनी ४0 लीटर पाण्याची टाकी बसवून, त्याला नळय़ांच्या साहाय्याने  सहा नोझल बसविले आणि त्यात टू स्ट्रोक इंजीन बसविले. या यंत्राद्वारे तूर,  उडीद, मूग, सोयाबीन, हरभरा, संत्रा, केळी आणि कपाशीला अवघ्या काही  तासांमध्ये फवारणी करता येते. 

Web Title: # Khamgaon Krishi Mahotsav: Multi-purpose spraying machine made by Siddhivinayak students!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.