#खामगाव कृषि महोत्सव : शेती करताना विचाराची दिशा बदला!  -  संजय उमाळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2018 05:55 PM2018-02-18T17:55:46+5:302018-02-18T17:58:38+5:30

खामगाव : शेती नफ्यात आणायची असेल तर शेतीमध्ये तंत्रज्ञानाचा आधार घ्यावा. त्यासाठी शेतकऱ्यांनी शेती करताना आपल्या विचाराची दिशा बदलायला हवी, असे प्रतिपादन जळगाव जामोद येथील कृषि विज्ञान केंद्राचे विषय विशेषज्ञ संजय उमाळे यांनी केले. 

# Khamgaon Krishi Mahotsav: Change the direction of thinking while farming! - Sanjay Umale | #खामगाव कृषि महोत्सव : शेती करताना विचाराची दिशा बदला!  -  संजय उमाळे

#खामगाव कृषि महोत्सव : शेती करताना विचाराची दिशा बदला!  -  संजय उमाळे

Next
ठळक मुद्देखामगाव येथील कृषि महोत्सवामध्ये १८ फेब्रुवारी रोजी आयोजित कृषि व कृषि पुरक शेती पद्धती विषयावर शेतकरी मार्गदर्शन सत्र. शेततळ्याच्या काठावर व शेतीच्या बांधावर सुद्धा विविध प्रकारचे फळझाडे घेवून उत्पादन घेवू शकता येते. या मार्गदर्शन सत्रला कृषि विभागाचे अधिकारी, कर्मचारी व शेतकऱ्यांची उपस्थिती होती. 

खामगाव : शेती अर्धवेळ नाही तर, पुर्णवेळ व्यवसाय समजला पाहिजे. शेती करताना नकारात्मक भूमीका ठेवू नका. शेती नफ्यात आणायची असेल तर शेतीमध्ये तंत्रज्ञानाचा आधार घ्यावा. त्यासाठी शेतकऱ्यांनी शेती करताना आपल्या विचाराची दिशा बदलायला हवी, असे प्रतिपादन जळगाव जामोद येथील कृषि विज्ञान केंद्राचे विषय विशेषज्ञ संजय उमाळे यांनी केले. 
ते खामगाव येथील कृषि महोत्सवामध्ये १८ फेब्रुवारी रोजी आयोजित कृषि व कृषि पुरक शेती पद्धती विषयावर शेतकरी मार्गदर्शन सत्रात ते बोलत होते. पुढे बोलताना संजय उमाळे म्हणाले की, शेती करताना नियोजन महत्वाचे आहे. एकात्मीक पद्धतीचा शेती अवलंब केल्यास उत्पादन वाढीबरोबरच कुटूंबाच्या विविध गरजाही पूर्ण होतील. त्यासाठी शेती करताना पशुपालन, रेशीम उद्योग हे जोडधंदेही करावे. कोरडवाहू शेती असेल तर उमेद गमावू नका. कोडवाहू शेतीत शेततळे घेतल्यामुळे पावसाचे जमा झालेले पाणी पीकांसाठी वापरून आपल्याला उत्पादन वाढविता येईल. शेततळ्याच्या काठावर व शेतीच्या बांधावर सुद्धा विविध प्रकारचे फळझाडे घेवून उत्पादन घेवू शकता येते. त्यामध्ये सीताफळ, रामफळ, संत्रा, मोसंबी, वाल यासारखे झाडे लावू शकता. शेतकºयांनी आपली आर्थिक उन्नती साधण्यासाठी स्वत: पिकविलेला माल स्वत: विक्री करणे महत्वाचे आहे. व्यापाºयाच्या भरवश्वार माल विक्री करणे तोट्याचे व अवघड होऊन बसले आहे. आंतर पीक, मिश्र पीक वाढवावे, असे आवाहनही संजय उमाळे यांनी यावेळी केले. या मार्गदर्शन सत्रला कृषि विभागाचे अधिकारी, कर्मचारी व शेतकºयांची उपस्थिती होती. 

Web Title: # Khamgaon Krishi Mahotsav: Change the direction of thinking while farming! - Sanjay Umale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.