Khamgaon: A case of murder in Kamble murder case against six people | खामगाव : कांबळे मृत्यूप्रकरणी सहा जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल

ठळक मुद्देचांदमारी भागातील वर्षापूर्वीची घटनासीआयडीने केलेल्या तपासाअंती आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : येथील चांदमारी भागात गेल्या एक वर्षापूर्वी झालेल्या मारहाणीत सुरेश वाल्मीक कांबळे याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. याप्रकरणी सीआयडीने केलेल्या तपासाअंती सहा आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा ६ डिसेंबर रोजी दाखल झाला. 
यासंदर्भात सीआयडी बुलडाणा पोलीस निरीक्षक योगेश पवार यांनी शहर पोस्टेला ६ डिसेंबर रोजी दिलेल्या फिर्यादीनुसार यातील मृतक सुरेश वाल्मीक कांबळे याच्याविरुद्ध शहर पोस्टेला अप नं. २९0/१६ भादंवि कलम ४५२, ३२३, ५0४ नुसार गुन्हा दाखल झाल्यामुळे तो ३ ऑगस्ट २0१६ बुलडाणा कारागृहात न्यायबंदी होता. ८ सप्टेंबर २0१६ रोजी त्याला डोके दुखणे, उलटी, मळमळ होत असल्याने सामान्य रुग्णालय बुलडाणा येथे भरती करण्यात आले होते. ९ सप्टेंबर २0१६ रोजी त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी सीआयडीने केलेल्या तपासात त्याला २८ व २९ ऑगस्ट २0१६ रोजी सहा आरोपींनी जबर मारहाण करून जखमी केले होते. या जखमांमुळे तो मरण पावला असल्याचे वैद्यकीय अहवालात निष्पन्न झाले. त्यावरुन हा गुन्हा दाखल झाला. 


Web Title: Khamgaon: A case of murder in Kamble murder case against six people
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.