खामगावात युवकाची ‘शिवशाही’ बसखाली आत्महत्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2018 01:54 AM2018-04-18T01:54:40+5:302018-04-18T01:57:00+5:30

खामगाव : दोन वेळा आत्महत्येचा प्रयत्न करूनही बचावलेल्या युवकाने अखेर मंगळवारी सकाळी शिवशाही बसच्या चाकाखाली उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना शहरातील खामगाव-अकोला मार्गावरील शर्मा टर्निंगवर सकाळी ७.१५ वाजता घडली. 

Khamaghat youth 'Shivshahi' bus suicide! | खामगावात युवकाची ‘शिवशाही’ बसखाली आत्महत्या!

खामगावात युवकाची ‘शिवशाही’ बसखाली आत्महत्या!

Next
ठळक मुद्देयुवाने यापूर्वी दोन वेळा केला होता आत्महत्येचा प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : दोन वेळा आत्महत्येचा प्रयत्न करूनही बचावलेल्या युवकाने अखेर मंगळवारी सकाळी शिवशाही बसच्या चाकाखाली उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना शहरातील खामगाव-अकोला मार्गावरील शर्मा टर्निंगवर सकाळी ७.१५ वाजता घडली. 
येथील शिवाजी नगरातील रहिवासी दीपक वसंत थिटे (वय ३१) याने सोमवारी रात्री १0 वाजताच्या दरम्यान हातावर ब्लेड मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. घडल्या प्रकारानंतर कुटुंबीयांनी त्याला तत्काळ सामान्य रुग्णालयात दाखल केले. उपचारानंतर रात्री त्याला रुग्णालयातून सुटीही झाली; मात्र मंगळवारी सकाळी कुटुंबीयांची नजर चुकवून दीपकने खामगाव-अकोला मार्गावरील शर्मा टर्निंगवर एका ट्रकखाली आत्महत्येचा प्रयत्न केला; मात्र ट्रक चालकाच्या प्रसंगावधानामुळे त्याचा दुसरा प्रयत्नही असफल ठरला. यावेळी काहींनी त्याला समजावण्याचाही प्रयत्न केला; मात्र त्यांनाही उलटसुलट बोलून, आणखी कुठले वाहन येते का, याची तो वाट पाहत बसला, असे प्रत्यक्षदश्रींनी ‘लोकमत’ला सांगितले. तेवढय़ात समोरून आलेल्या शिवशाही बस (क्र. एमएच 0४-एसके ३१५१) समोर त्याने वेळ साधली व बसच्या मागच्या चाकांखाली त्याने स्वत:ला झोकून दिले. 
    बसची मागची चाके डोक्यावरून गेल्याने दीपकचा जागेवरच मृत्यू झाला. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून दीपकचा मृतदेह ताब्यात घेतला व शवविच्छेदनासाठी रवाना केला. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. या घटनेने शिवाजी नगर भागात हळहळ व्यक्त होत आहे. 

Web Title: Khamaghat youth 'Shivshahi' bus suicide!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.