खडकपूर्णा पाणीपुरवठा योजना मार्च २०२० पर्यंत पूर्ण करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2019 02:31 PM2019-06-19T14:31:21+5:302019-06-19T14:31:26+5:30

बुलडाणा : शहरासाठी मंजूर असलेली खडकपूर्णा प्रकल्पावरील पाणी पुरवठा योजना मार्च २०२० पर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

 The Khadakpura water supply scheme will be completed by March 2020 | खडकपूर्णा पाणीपुरवठा योजना मार्च २०२० पर्यंत पूर्ण करणार

खडकपूर्णा पाणीपुरवठा योजना मार्च २०२० पर्यंत पूर्ण करणार

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : शहरासाठी मंजूर असलेली खडकपूर्णा प्रकल्पावरील पाणी पुरवठा योजना मार्च २०२० पर्यंत पूर्ण करण्यात येणार असून येळगाव धरणावरील जलशुध्दीकरण केंद्रांच्या दुरूस्तीबाबत आवश्यक यांत्रिकी, स्थापत्य विषयक सर्व कामे पूर्ण करण्यात येत असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. आ. हर्षवर्धन सपकाळ यांनी बुलडाणा शहरातील कृत्रीम पाणी टंचाई व दूषित पाणीपुरवठ्याच्या अनुषंगाने मंगळवारी विधानसभेत उपस्थित केलेल्या तारांकीत प्रश्नाच्या लेखी उत्तरात मुख्यमंत्र्यांनी ही ग्वाही दिली.
बुलडाणा शहरासह सुमारे दीड लाख लोकसंख्येला होणाऱ्या अशुध्द पाणी पुरवठ्याच्या प्रश्नावर आ. हर्षवर्धन सपकाळ यांनी येळगाव येथील जलशुध्दीरकरण केंद्राच्या दुरावस्थेचा प्रश्न रेटून धरला आहे. निर्ढावलेल्या नगर परिषद प्रशासनाकडून जनतेच्या आरोग्याबाबत महत्त्वपूर्ण असलेल्या या प्रश्नाकडे होणारी डोळेझाक बघता आ. हर्षवर्धन सपकाळ यांनी स्वत: च जलशुध्दीकरण केंद्राच्या सफाईची मोहीम हाती घेतली होती. हा विषय पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांच्यापातळीवर पोहचला होता. बुलडाण्याचे तहसिलदार संतोष शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली जलशुध्दीकरण केंद्रांच्या पाहणीसाठी पथक सुध्दा पाठविण्यात आले होते. या पथकाने नगर परिषदेचे मुख्याधिकाऱ्यांवर ठपका ठेवीत पालिकेच्या कारभारावर गंभीर ताशेरे ओढले होते. अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रमोदसिंग दुबे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या तातडीच्या बैठकीत १० जून पर्यंत कारभार सुरळीत करण्याचा अल्टिमेटम नगर परिषद प्रशासनास देण्यात आला होता. त्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. निरूपमा डांगे यांच्या अध्यक्षतेखाली सुध्दा या प्रश्नावर १४ जून रोजी विशेष बैठक घेण्यात आली. दरम्यान, विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसºया दिवशी आ. हर्षवर्धन सपकाळ यांनी तारांकीत प्रश्नाच्या माध्यमातून हा प्रश्न विधीमंडळाच्या पटलावर आणला.
त्याअनुषंगाने दिलेल्या लेखी उत्तरात बुलडाणा शहरात अशुध्द पाणीपुरवठा झाल्याची कबुली देत जलवाहिन्यांच्या गळतीमुळे हा प्रकार घडल्याचे सांगितले आहे. त्यासाठी अनुषंगिक दुरूस्ती करण्यात आल्याचे सांगून शहराला पाणीपुरवठा करण्यात येणाºया जलशुध्दीकरण केंद्रावरील यांत्रिकी, स्थापत्य कामे व त्यासाठी नवीन उपांगे खरेदी प्रक्रीया इत्यादी बाबी पूर्ण करण्यात येत असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. आ. हर्षवर्धन सपकाळ यांनी शहरातील अशुध्द पाणी पुरवठा व नादुरूस्त जलशुध्दीकरण केंद्राबाबत यापूर्वी अनेकदा केलेल्या तक्रारींना मुख्यमंत्र्यांनी मान्य करून एकप्रकारे दुजोराच दिला आहे.
 
प्रशासनाच्या भुमिकेवर नाराजी
बुलडाणा शहरासाठी मंजूर असलेली ८२.७७ कोटी रूपयांची खडकपूर्णा प्रकल्पावरील पाणी पुरवठा योजना मार्च २०२० पर्यंत पूर्ण करण्यात येईल येईल अशी ग्वाही सुध्दा मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. दरम्यान नगर पालिका प्रशासनाच्या उदासिन भूमिकेमुळे शहरातील अशुध्द व अनियमित पाणी पुरवठ्यावरून संतापलेल्या नागरिकांना आ. हर्षवर्धन सपकाळ यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे दिलासा मिळाला आहे. तसेच शहरातील पाणी पुरवठा व्यवस्थेच्या दुरावस्थेबाबत प्रशासनाकडून घेण्यात आलेल्या वेळकाढू भूमिकेबद्दल आ. हर्षवर्धन सपकाळ यांनी तीव्र नाराजी व्यक्त त्वरीत कार्यवाहीची अपेक्षा व्यक्त केली आहे.

Web Title:  The Khadakpura water supply scheme will be completed by March 2020

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.