खामगावात कावड यात्रेचा ‘माहोल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2018 04:46 PM2018-09-03T16:46:45+5:302018-09-03T17:35:15+5:30

खामगाव : श्रावण महिन्याच्या शेवटच्या सोमवारी, ३ सप्टेंबररोजी  शहरातून भव्य कावड यात्रा निघाली.

Kawad yatra procession in Khamgaon | खामगावात कावड यात्रेचा ‘माहोल’

खामगावात कावड यात्रेचा ‘माहोल’

googlenewsNext
ठळक मुद्दे खामगाव शहरात या कावड यात्रा उत्सवाला भव्य-दिव्य स्वरूप येताना दिसत आहे.कावडधारींनी वेगवेगळ्या ठिकाणावरून आणलेल्या पवित्र जलाव्दारे पहाटेच शिवमंदीरांमध्ये जलाभिषेक केला.

खामगाव : श्रावण महिन्याच्या शेवटच्या सोमवारी, ३ सप्टेंबररोजी  शहरातून भव्य कावड यात्रा निघाली. कावडयात्रा उत्सवाला शहरात वर्षागणिक भव्य-दीव्य स्वरूप येत आहे. शहरातून निघालेल्या कावडयात्रेत १३ कावडधारी मंडळ सहभागी झाले होते. ‘हर बोला महादेव’ च्या गजराने अवघे शहर दणाणून गेले होते. श्रावण महिना हिंदु संस्कृतीत अतिशय पवित्र मानला जातो. श्रावणातील सोमवारला विशेष महत्व असून सोमवारी शिवपिंडीला पवित्र जलाव्दारे अभिषेक घालण्याची परंपरा आहे. त्यामुळे प्रत्येक श्रावण सोमवारी शिवभक्त कावडधारी वेगवेगळ्या तिर्थस्थळावरून पवित्र जल आणून शिवमंदीरात जलाभिषेक करीत असतात. उत्सवांचे शहर म्हणून ओळखल्या जाणाºया खामगाव शहरात या कावड यात्रा उत्सवाला भव्य-दिव्य स्वरूप येताना दिसत आहे. प्रत्येक श्रावण सोमवारी शहरातील विविध मंडळांचे शेकडो कावडधारी तीर्थस्थळांवरून खांद्यावर कावड घेवून जल आणत असतात. आज रावणातील शेवटचा सोमवार असून कावडधारींनी वेगवेगळ्या ठिकाणावरून आणलेल्या पवित्र जलाव्दारे पहाटेच शिवमंदीरांमध्ये जलाभिषेक केला. त्यानंतर वाजत-गाजत कावडधारींची शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. यामध्ये नवयुवक मानाची कावडयात्रा मंडळ दाळफैल, नेताजी मंडल जलालपुरा, जगदंबा बाळापूर फैल, जय भवानी चांदमारी, वीर हनुमान शंकर नगर, जगदंबा बाळापूर फैल, काशी विश्वनाथ कावडयात्रा मंडळ धोबी खदान, जय संतोषी मॉ फरशी, बजरंग दल गोपाळ नगर, शिवभक्त मंडळ सजनपूरी, शिवाजी मित्र मंडळ शिवाजी नगर, कालिंका सार्वजनिक मंडळ शिवाजी वेस, श्रीकृृष्ण मंडळ रेखा प्लॉट या १३ मंडळांनी वेगवेगळ्या भागातून डी.जे. पारंपारीक वाद्य वाजवून भव्य मिरवणूक काढली. यामध्ये शिवभक्त नागरीक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या मिरवणुकीदरम्यान पोलिसांकडून चोख बंदोबस्त लावण्यात आला होता. 

लोकप्रतिनिधीकडून स्वागत 
कावडयात्रेचे शहरात ठिकठिकाणी लोकप्रतिनिधींकडून स्वागत करण्यात आले. महाराष्ट्Ñ भाजप मिडिया सेलचे सदस्य सागर फुंडकर व भाजप पदाधिकाºयांनी कावडधाºयांचे स्वागत करून शिवप्रतिमांचे दर्शन घेतले. याशिवाय बुलढाणा जिल्हा काँग्रेस सेवादल अध्यक्ष तेजेंद्रसिंग चौहान यांनी कावड यात्रेचे स्वागत  केले. कावड यात्रेत शहरातील अनेक कावड यात्रा मंडळासह अकोल्यातून गायगाव, शेगाव, नांदुरा, संग्रामपूर तालुक्यातील मंडळेही सहभागी झाले होते.

Web Title: Kawad yatra procession in Khamgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.