बुलडाणा येथे सामूहिक सूर्यनमस्कार  : ३ हजार ७०० विद्यार्थ्यांचा सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2018 06:41 PM2018-02-09T18:41:06+5:302018-02-09T18:42:12+5:30

बुलडाणा : स्थानिक जिजामाता व्यापारी क्रीडा संकुल येथे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व क्रीडा भारती यांचा संयुक्तविद्यमाने ९  फेब्रुवारी रोजी  सकाळी ७.३० वाजता ‘सामूहिक सूर्यनमस्कार’ प्रात्यक्षिकांचा कार्यक्रम  घेण्यात आला.

Group Surya Namaskar in Buldana: 3 thousand 700 students participated | बुलडाणा येथे सामूहिक सूर्यनमस्कार  : ३ हजार ७०० विद्यार्थ्यांचा सहभाग

बुलडाणा येथे सामूहिक सूर्यनमस्कार  : ३ हजार ७०० विद्यार्थ्यांचा सहभाग

Next
ठळक मुद्देक्रीडा अधिकारी कार्यालय व क्रीडा भारती यांचा संयुक्त उपक्रम. स्थानिक जिजामाता व्यापारी क्रीडा संकुल येथे सामूहिक सूर्यनमस्कार’ प्रात्यक्षिकांचा कार्यक्रम  घेण्यात आला. जिल्हा अधिकारी कार्यालय, पोलीस प्रशासन, जिल्हा परिषद, स्काऊट गाईड, अशा विविध शासकीय घटकांनी यावेळी सहभाग नोंदविला.

बुलडाणा : स्थानिक जिजामाता व्यापारी क्रीडा संकुल येथे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व क्रीडा भारती यांचा संयुक्तविद्यमाने ९  फेब्रुवारी रोजी  सकाळी ७.३० वाजता ‘सामूहिक सूर्यनमस्कार’ प्रात्यक्षिकांचा कार्यक्रम  घेण्यात आला.
बुलडाणा शहरातील विविध शाळा, महाविद्यालये, योग्य प्रशिक्षण केंद्रे, सर्वोदय योग्य साधना ग्रुप, आर्ट आॅफ लिविंग परिवार, योगांजली योग्य साधना केंद्र, आयुर्वेद महाविद्यालय अश्या विविध सामाजिक संघटना यांच्या विशेष प्रयत्नातून सुमारे ३ हजार ७०० विद्यार्थी व १ हजारापेक्षा जास्त नागरिकांनी या उपक्रमात सहभाग घेतला. जिल्हा अधिकारी कार्यालय, पोलीस प्रशासन, जिल्हा परिषद, स्काऊट गाईड, अशा विविध शासकीय घटकांनी यावेळी सहभाग नोंदविला. या कार्यक्रमास आमदार हर्षवर्धन सपकाळ, जि. प. अध्यक्षा उमा तायडे, सभापती श्वेता महाले, योगेंद्र गोडे, जिल्हाधिकारी डॉ. पुलकुंडवार, अतिरिक्त मुख्य कार्यपालन अधिकारी शिंदे तसेच क्रीडाभारतीचे राष्ट्रीय सहमंत्री प्रसन्न हरदास, जिल्हा क्रीडा अधिकारी पाटील, श्रीकृष्ण शेटे, सदानंद काणे, बाळ अयाचित,  अंजली परांजपे, डॉ. उबरहांडे, प्रकाश लहासे, जेष्ठ योग्य मार्गदर्शक उबरहंडे, सर्व पत्रकार बांधव यांची विशेष उपस्थिती होती. यावेळी उपक्रमास आर्थिक सहकार्य करणाºया संस्थेचे प्रतिनिधी यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. यामध्ये योगेंद्र गोडे, डॉ. राजेंद्र गोडे कृषी महाविद्यालय, स्टेट बँक आॅफ इंडिया, रिजिनल आॅफिस, ओमेगा सिस्टिम्स नाशिक, व्ही एम स्पोर्ट्स, शाकंभरी ट्रेडर्स आदींचा समावेश होता. या कार्यक्रमास क्रीडा अधिकारी कार्यालयाचे प्रशिक्षक इंगळे, अनिल कुलकर्णी, नितीन श्रीवास, आशिष चौबे आदींनी परिश्रम घेतले.

Web Title: Group Surya Namaskar in Buldana: 3 thousand 700 students participated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.