रस्त्यावर दूध फेकून शासनाचा निषेध;  स्वाभिमानी संघटनेचे आंदोलन भडकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2018 06:12 PM2018-07-17T18:12:54+5:302018-07-17T18:13:39+5:30

धाड : बुलडाणा तालुक्यातील ग्राम चांडोळ जवळील इरला व करडी फाट्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी १७ जुलै रोजी रस्त्यावर दूध फेकून शासनाचा निषेध केला.

Government prohibition by throwing milk on the road | रस्त्यावर दूध फेकून शासनाचा निषेध;  स्वाभिमानी संघटनेचे आंदोलन भडकले

रस्त्यावर दूध फेकून शासनाचा निषेध;  स्वाभिमानी संघटनेचे आंदोलन भडकले

googlenewsNext
ठळक मुद्दे बुलडाणा जिल्ह्यात सर्वत्र स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. इरला ग्राम फाट्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दुधाची मालवाहक गाडी अडवून दूध रस्त्यावर ओतले.

लोकमत न्यूज नेटवर्क

धाड : बुलडाणा तालुक्यातील ग्राम चांडोळ जवळील इरला व करडी फाट्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी १७ जुलै रोजी रस्त्यावर दूध फेकून शासनाचा निषेध केला. तसेच दूध दरवाढीसाठी करण्यात येणाºया राज्यव्यापी आंदोलनाला पाठींबा दिला. शेतकºयांचे दूध दरवाढ आणि अनुदानाचे मुद्यांवरून बुलडाणा जिल्ह्यात सर्वत्र स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. त्याचे पडसाद दुसºया दिवशी कायमच होते. आज सकाळी बुलडाणा तालुक्यातील ग्राम चांडोळ गावानजीकच्या इरला ग्राम फाट्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दुधाची मालवाहक गाडी अडवून दूध रस्त्यावर ओतले. तद्नंतर या ठिकाणी धाड मधील अमर दूध डेअरीचे दुग्ध संकलन केंद्र बंद पाडून शासनाचे विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तर करडी धाड फाट्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर दूध ओतून शासनाचा निषेध व्यक्त केला. याठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पश्चीम विदर्भ प्रमुख राणा चंदन यांचे मार्गदर्शनात आंदोलन करण्यात आले होते. यावेळी पोलिसांनी राणा चंदनसह शे.रफिक शे.करीम, समाधान नागवे, भगतसिंग धनावत, प्रेमसिंग धनावत व इतर ८ जणांना ताब्यात घेवून त्याची नोंद घेतली आहे. 

शेतकºयांना ५ रूपये प्रमाणे दरवाढ मिळत नाही, तोवर आंदोलन सुरूच राहणार, नव्हेतर अधिक तीव्र करणार.

- राणा चंदन, पश्चीम विदर्भ प्रमुख, स्वाभिमानी शेतकरी संघटना 

Web Title: Government prohibition by throwing milk on the road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.