Giving a teacher to the schoolgirl! | संग्रामपूर येथे विद्यार्थिनींसोबत चाळे करणार्‍या शिक्षकाला दिला चोप!

ठळक मुद्देतीन विद्या र्थीनीसोबत अश्लिल चाळे केल्याची संतापजनक घटनासंग्रामपूरातील एका जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळेतील प्रकार

लोकमत न्यूज नेटवर्क
बोरखेड : संग्रामपूर पंचायत समिती अंतर्गत येणार्‍या एका जिल्हा परिषद मराठी  उच्च प्राथमिक शाळेवर कार्यरत असलेल्या एका शिक्षकाने चक्क तीन विद्या र्थीनीसोबत अश्लिल चाळे केल्याची संतापजनक घटना ५ डिसेंबर रोजी एक वाज ताच्या सुमारास घडली. 
बोरखेडपासून काही अंतरावरील एका जिल्हा परिषद शाळेतील इयत्ता पहिला  वर्गाला शिक्षणाचे धडे शिकवण्याकरीता दररोज हा शिक्षक तेल्हारा तालुक्यातून  ये-जा करतो. 
मात्र ५ डिसेंबर रोजी दुपारी अचानक या शिक्षकाची वक्रदृष्टी याच शाळेतील वर्ग  पाचमध्ये शिकणार्‍या तीन विद्यार्थीनींवर पडली. तरी या शिक्षकाने वेळेचा फायदा घे त त्या विद्यार्थीनीसोबत हा शिक्षक अश्लील चाळे करणे सुरु केले. अखेर घडलेला  प्रसंग विद्यार्थीनींनी मनात न ठेवता आपआपल्या पालकांना सांगितला. अखेर  पालकासह गावकर्‍यांनी शाळेत जावून घडलेल्या प्रकाराबद्दल त्या शिक्षकाला  विचारला केली असता तो उडवाउडवीचे उत्तरे देवू लागला. अखेर संतापाने उपस् िथत काही जणांनी त्या शिक्षकाची जबर धुलाई केली व समज देवून प्रकरण  थांबवले. या आधी या शिक्षकावर एका शाळेवरील विद्यार्थीनीसोबत अश्लील चाळे  केल्याचा गुन्हा  पोलिसात दाखल आहे.