बाजार व हमीभावातील फरकाची रक्कम द्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2017 01:17 AM2017-11-16T01:17:18+5:302017-11-16T01:17:22+5:30

चिखली : सरकारने उडीद व सोयाबीनची खरेदी करण्याऐवजी बाजारभाव व हमीभाव यातील फरक थेट उत्पादक शेतकर्‍यांना द्यावा, अशी मागणी चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती डॉ.सत्येंद्र भुसारी यांनी एका निवेदनाद्वारे मुख्यमंत्री व कृषी मंत्र्यांकडे केली आहे.

Give the difference between market and guaranteed! | बाजार व हमीभावातील फरकाची रक्कम द्या!

बाजार व हमीभावातील फरकाची रक्कम द्या!

googlenewsNext
ठळक मुद्देबाजार समिती सभापती भुसारी यांची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
चिखली : सरकारने उडीद व सोयाबीनची खरेदी करण्याऐवजी बाजारभाव व हमीभाव यातील फरक थेट उत्पादक शेतकर्‍यांना द्यावा, अशी मागणी चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती डॉ.सत्येंद्र भुसारी यांनी एका निवेदनाद्वारे मुख्यमंत्री व कृषी मंत्र्यांकडे केली आहे.
सरकारने जाहीर केलेल्या हमीभावाने उडीद, मूग, सोयाबीन या शेतमालाची नाफेडमार्फत खरेदी करण्यात येते. या खरेदी केंद्रावर माल विक्रीसाठी येणार्‍या अनंत अडचणींमुळे शेतकर्‍यांची प्रचंड फरफट होते. त्यात विक्रीनंतर मालाचे चुकारेही लवकर मिळत नसल्याने अनेक शेतकरी नाइलाजाने आपला शेतमाल बाजारात विक्री करतो. त्यामुळे त्यास मोठा तोटा सहन करावा लागतो. यावर उपाय करण्यासाठी कायदे कमी पडतात, शिवाय सद्यस्थितीत बाजारभावावर नियंत्रण ठेवणे आयात धोरणामुळे हाताबाहेर गेले आहे. म्हणून शेतकर्‍यांना हेक्टरी पीक र्मयादा ठरवून देऊन उडिदासाठी बाजारभाव ४ हजार व हमीभाव ५ हजार ४00 असा असेल तर त्यातील फरकाची रक्कम १४00 रुपये यानुसार प्रत्येक शेतमाल खरेदी न करता या खरेदीतील भावफरक शेतकर्‍यांच्या खात्यात जमा केल्यास शेतकर्‍यांची हेळसांड थांबून भ्रष्टाचारालाही आळा बसण्यास मदत होईल व शासनाचेही नुकसान टळणार असल्याने शेतमालाची खरेदी न करता शेतकर्‍यांना भाव फरकाची रक्कम देण्यात यावी, अशी मागणी डॉ.सत्येंद्र भुसारी यांनी मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस व कृष मंत्री ना.भाऊसाहेब फुंडकर यांच्याकडे केली आहे. 

खरेदीची संथ गती
चिखली तालुक्यातील ५ हजार श्ेातकर्‍यांनी सध्या शेतमालाच्या विक्रीसाठी नोंदणी केली आहे. गेल्या २0 दिवसांत यापैकी केवळ ३५0 शेतकर्‍यांच्या मालाचीच प्रत्यक्षात मोजणी झालेली आहे. खरेदीची हीच स्थिती राहिल्यास उर्वरित शेतकर्‍यांच्या मालाची मोजणी होण्यास किमान सहा महिने लागणार आहे. इतके दिवस सामान्य शेतकरी दम धरू शकत नाही, या बाबीचाही विचार व्हावा, अशी मागणी डॉ.भुसारी यांनी या निवेदनात केली आहे.

Web Title: Give the difference between market and guaranteed!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.