खंडणी मागणार्‍या चार तोतया पत्रकारांना अटक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 01:15 AM2017-11-20T01:15:29+5:302017-11-20T01:16:29+5:30

शेगाव: तुमच्या लॉजमध्ये अवैध धंदे चालतात, आम्ही पत्रकार आहोत, असे सांगून  खंडणी मागणार्‍या अकोला आणि वाशिम जिल्हय़ातील चार तोतया पत्रकारांना  शेगाव पोलिसांनी रंगेहात पकडून अटक केली आहे.

Four robbery journalists demanding ransom! | खंडणी मागणार्‍या चार तोतया पत्रकारांना अटक!

खंडणी मागणार्‍या चार तोतया पत्रकारांना अटक!

Next
ठळक मुद्देलॉज व्यवस्थापकाला करीत होते ब्लॅकमेलकार, ओळखपत्र, रेकॉर्डिंगचे साहित्य जप्त   

लोकमत न्यूज नेटवर्क
शेगाव: तुमच्या लॉजमध्ये अवैध धंदे चालतात, आम्ही पत्रकार आहोत, असे सांगून  खंडणी मागणार्‍या अकोला आणि वाशिम जिल्हय़ातील चार तोतया पत्रकारांना  शेगाव पोलिसांनी रंगेहात पकडून अटक केली आहे. रविवारी पहाटे मंदिर परिसरात  ही कारवाई करण्यात आली असून, आरोपींकडून बनावट ओळखपत्र, रेकॉर्डिंगचे  साहित्य आणि मोबाइल जप्त करण्यात आले आहे.
शेगाव शहरात प्रमुख व्यवसाय म्हणजे लॉजेस आहे. त्यामुळे लॉजमालकांना  ब्लॅकमेल करून त्यांच्याकडून खंडणी उकळण्याच्या उद्देशाने अकोला व वाशिम  जिल्हय़ातील चार कथित पत्रकार शेगावात दाखल झाले. त्यांनी काही  लॉजमालकांना गाठून तुमच्या लॉजमध्ये अवैध व्यवसाय चालत असून, त्याचे  व्हिडिओ रेकॉर्डिंग आमच्याकडे आहे. आम्हाला लॉजेस चेक करण्याचा अधिकार  आहे. पोलीसही आमचे काही करू शकत नाही, असे बोलून रात्री चार लॉजेसमध्ये  धुमाकूळ घातला. सदर इसम हे तोतया पत्रकार असल्याचे लक्षात आल्यावरून  विशाल गेस्ट हाऊसचे व्यवस्थापक मुजीब हुसैन रियाज हुसैन यांनी पोलिसांना  पाचारण केले. पोलिसांनीही हा प्रकार पहिला. यावेळी मद्यधुंद असलेल्या या आरो पींनी पोलिसांनाही जुमानले नाही. त्यामुळे पोलिसांनी खाक्या दाखवून सर्वांना गाडीत  टाकले. त्यांच्याकडून एक कार, बनावट ओळखपत्र, रेकॉडर्ि्ंगचे साहित्य आणि  मोबाइल जप्त करण्यात आले. या प्रकरणी मुजीब हुसैन यांच्या फिर्यादीवरून शहर  पोलिसांनी आरोपी जितेंद्र राऊत रा. वाशिम, राजकुमार वानखडे रा. वाशिम, मयूर  महल्ले रा. पिंजर आणि दीपक ठाकरे रा. मंगरुळपीर यांच्याविरुद्ध अप.क्र.४८९/१७  कलम ३८४, ५0४, ५0६, ३४ भादंवि अन्वये गुन्हा शेगाव पोलिसात दाखल  करण्यात आला. सदर आरोपींना स्थानिक न्यायालयात १९ नोव्हेंबर रोजी हजर  केले असता न्यायालयाने त्यांना एका दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश  दिले. घटनेचा पुढील तपास सपोनि. भारती गुरनुले ह्या करीत आहेत. 
 

Web Title: Four robbery journalists demanding ransom!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.