दिव्यांग व महिला बचत गटांना दिला आर्थिक आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2018 12:33 PM2018-08-19T12:33:13+5:302018-08-19T12:35:21+5:30

मेहकर : शहरातील १०७ दिव्यांगाना व १० महिला बचत गटांना प्रत्येकी फिरता निधी  म्हणून मेहकर नगर परिषदेच्या वतीने आर्थिक आधार देण्यात आला. दिव्यांगांना व महिला बचत गटांना शनिवारला धनादेशाचे वाटप करण्यात आले.

Financial support given to Divyang and women saving groups | दिव्यांग व महिला बचत गटांना दिला आर्थिक आधार

दिव्यांग व महिला बचत गटांना दिला आर्थिक आधार

googlenewsNext
ठळक मुद्देयावेळी एकुण १०७ अपंग लाभार्थ्यांना प्रत्येकी ९ हजार ३०० रूपयाचा धनादेश देण्यात आला. १० महिला बचत गटांना प्रत्येकी १० हजार रूपयांचा फिरता निधी म्हणून नगराध्यक्ष कासम गवळी व मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला.

मेहकर : शहरातील १०७ दिव्यांगाना व १० महिला बचत गटांना प्रत्येकी फिरता निधी  म्हणून मेहकर नगर परिषदेच्या वतीने आर्थिक आधार देण्यात आला. दिव्यांगांना व महिला बचत गटांना शनिवारला धनादेशाचे वाटप करण्यात आले.
        कार्यक्र माच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष हाजी कासम गवळी हे होते. तर न.प. गट नेते मो. अलीम ताहेर, पंकज हजारी, माजी नगराध्यक्ष राजेश अंभोरे, ललीत इन्नाणी, नीलेश मानवतकर, संजय ढाकरके, अलियार खान, नीलेश सोमन, मुजीब खान, तौफीक खान, अहमद हसन काजी, युनुस खान, अख्तर चौधरी, जिगर शहा, आदींची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नगरसेवक अनंतराव वानखेडे यांनी केले. यावेळी एकुण १०७ अपंग लाभार्थ्यांना प्रत्येकी ९ हजार ३०० रूपयाचा धनादेश व १० महिला बचत गटांना प्रत्येकी १० हजार रूपयांचा फिरता निधी म्हणून नगराध्यक्ष कासम गवळी व मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी नगराध्यक्ष कासम गवळी यांनी विविध योजनेची माहिती देवून या योजनांचा प्रत्येक लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन केले. कार्याक्रमाला रमेश उतपुरे, चिंचोले, विशाल शिरपुळकर, अनिल मुळे, संजय खोडके, शेख जफर, संतोष राणे, पवन भादुपोता, विलास जंजाळ, आदी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Financial support given to Divyang and women saving groups

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.