कन्यादानापूर्वीच पित्याने घेतला जगाचा निरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2017 12:42 AM2017-11-16T00:42:48+5:302017-11-16T00:52:41+5:30

धानोरा (महासिध्द) : पुंडलीकराव बोंबटकार यांच्या मुलीचे गुरुवारी लग्न असल्याने, बुधवारी मुलीला हळद लावण्याच्या कार्यक़्रमाची पूर्ण तयारी झालेली. परंतु नियतीच्या मनात काही वेगळेच. मंगळवारी रात्री पुंडलिकराव बोंबटकार यांनी जगाचा निरोप घेतला. किडणीच्या विकाराने बर्‍याच दिवसापासून ते आजारी होते. 

Father's Message to the Father | कन्यादानापूर्वीच पित्याने घेतला जगाचा निरोप

कन्यादानापूर्वीच पित्याने घेतला जगाचा निरोप

Next
ठळक मुद्दे किडनीच्या विकाराने घेतला आणखी एक बळी धानोरा महासिद्ध गावात शोककळा 

संदीप भोपळे । 
लोकमत न्यूज नेटवर्क
धानोरा (महासिध्द) : गुरुवारी  मुलीचे लग्न असल्याने येथील पुंडलीकराव बोंबटकार यांच्या कुटुंबात  आनंदाचे वातावरण. लग्न तयारीची लगबग. बुधवारी मुलीला हळद लावण्याच्या कार्यक़्रमाची पूर्ण तयारी झालेली. परंतु नियतीच्या मनात काही वेगळेच. मंगळवारी रात्री पुंडलिकराव बोंबटकार यांनी जगाचा निरोप घेतला. ते किडणीच्या विकाराने बर्‍याच दिवसापासून आजारी होते. 
नववधू शितलला ज्या पित्याचे आशीर्वाद पाहिजे होते. तेच मिळण्यापूर्वीच काळाने लग्न समारंभाच्या पुर्वसंध्येला हिरावून घेतले. किडनी आजाराचे थैमान या परिसरात सुरु आहे. त्याचा एक नववधूपिता बळी ठरला. किडनी आजाराचा शापच या भागाला लागला की काय? पुंडलीक गणपत बोंबटकार (वय ४१) यांचेकडे एक एकर शेती. छोटीसी पानपट्टी. यातून कुटूंबाचे उदरपोषण. मोठी मुलगी शितल हिचे दीड महिन्यापुर्वी खामगाव तालुक्यातील बोरजवळा येथील रमेश ओंकार वानखडे यांचे सुपुत्र सचिन यांचेशी लग्न ठरले. लग्नाची सर्व तयारी झाली. गुरुवार लग्न असल्याने बुधवारी मुलाच्या व मुलीच्या कुटूंबियांकडे नववधू-वरांना हळद लागण्याचा कार्यक़्रम, पण नववधूला हहद लागण्यापुर्वीच पित्याची अंत्ययात्रा झाली. सर्व समाजमन हळहळले. नियतीपुढे सर्व हतबल असल्याचा पुन्हा .. आला. लग्न समारंभ या घटनेने पुढे ढकलावा लागला. 
आता लग्न समारंभ करण्याची जबाबदारी शितलची आई लिलाबाई यांना पार पाडावी लागणार. कारण शितल ही सर्वात मोठी बहीण, प्रतिक्षा ही लहान तर महेश भाऊ हा सर्वात लहान. आयुष्यभर आठवणीत राहिल असे दु:ख शीतलच्या वाट्याला आले असले तरी वराळाडची मंडळी ही अत्यंत समजुतदार असल्याने त्यांनी या अचानक झालेल्या आपत्तीला मनापासून साद दिली यातून भविष्यात शितलचे दु:ख कमी होण्यास मदत होईल. काळाने आपला डाव साधला. परंतु शितलला आता त्यावर मात करावी लागणार. संपुर्ण धानोर्‍यात हळहळ व्यक्त होत असून बोंबटकार कुटूंबीयांना धीर देत आहेत. 

आनंदावर क्षणात विरजन 
घरात लग्न समारंभ असल्याने नातेवाईक, मित्र परिवाराने घर भरून गेले होते. शितलच्या लग्नाची तयारी अंतीम टप्प्यात होती. अशात पुंडलिक बोंबटकार यांची तब्येत बिघडली. अन त्यांनी क्षणात जगाचा निरोप घेतला. क्षणात घरातील आनंदावर विरजन पडून रडापड सुरू झाली. गावकर्‍यांनी कुटूंबीयांना धीर दिला. 

प्रशासन दखल घेईल काय?
पुंडलिक बोंबटकार यांनी किडणीच्या विकारासोबत झुंज देत कुटूंबाला सावरले. पण ऐन मुलीच्या लग्नाच्या वेळी त्यांनी जगाचा निरोप घेतला. या मुळे बोंबटकार कुटूंबीयावर दु:खाचा डोंगरच कोसळला. घरातीलच नव्हेतर संपूर्ण गावावर शोककळा पसरली. अशा प्रकारच्या घटना या गावात घडत असतांना प्रशासनाकडून मात्र दखल घेतल्या जात नसावी यापेक्षा दुसरे दुदैव कोणते म्हणावे ! आणखी किती बळी देण्याची प्रशासन वाट पाहत असावे ?

Web Title: Father's Message to the Father

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.