शेतकऱ्यांनी बुलडाण्यात केली एचटीबीटी कापसाची लागवड ; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कायदेभंग आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2019 05:55 PM2019-06-24T17:55:50+5:302019-06-24T17:55:58+5:30

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी एच.टी.बी.टी. कापसाच्या बियाण्याची लागवड केली.  

Farmers planted HTBT cotton in Buldhana; Khedbhanga agitation in front of the Collector's office | शेतकऱ्यांनी बुलडाण्यात केली एचटीबीटी कापसाची लागवड ; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कायदेभंग आंदोलन

शेतकऱ्यांनी बुलडाण्यात केली एचटीबीटी कापसाची लागवड ; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कायदेभंग आंदोलन

Next


बुलडाणा:  कापासाच्या एचटीबीटी बियाण्यावर बंदी करणाऱ्या धोरणाचा निषेध करण्यासाठी शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेच्यावतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सविनय कायेभंग आंदोलन करण्यात येत आहे. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी एच.टी.बी.टी. कापसाच्या बियाण्याची लागवड केली.  
‘शेतकºयांना बाजारपेठेचे व तंत्रज्ञानाचे स्वातंत्र्य मिळालेच पाहिजे, आमचं वावर आमची पावर, खुल्या अर्थव्यवस्थेला पर्याय नाही, भीक नको घेवू घामाचे दाम..’ अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी बियाण्याची पॉलीथीनच्या पिशव्यांमध्ये लागवड केली. शेतकरी संघटनेचे राज्य कार्यकारीणी सदस्य नामदेवराव जाधव यांनी एचटीबीटीच्या कापसाच्या वाणाचे फायदे सांगून शासानाचा धोरणाचा निषेध केला. यावेळी जि.प.माजी सदस्य एकनाथ पाटील थुट्टे म्हणाले केंद्र सरकारचा हा शेतकरी विरोधी बियाणे प्रतिबंधीत कायदा आम्ही धुडकावत लावुन भरोसा या गावातील शेतकºयांनी प्रतिबंधीत बियाण्याची लागवड करून कायदेभंग आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदविला. शेतकºयांनी या शेतकरी विरोधी कायद्याच्या बेड्या तोडण्यासाठी संघर्ष करण्यास तयार राहण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी वामनराव जाधव यांनीसुध्दा शेतकºयांना संबोधित केले. त्यानंतर मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाºयांना देण्यात आले. या आंदोलनामध्ये प्रामुख्याने ज्ञानेश्वर जाधव, देविदास कणखर, समाधान कणखर, डॉ. विनायक वाघ, ज्ञानदेव साळवे, विश्वनाथ जाधव, शामराव जाधव, हरिदास खांडेभराड, गणेश ताठे, गणेश वाघ, बालाजी जाधव, डॉ. देविदास भगत, रतिराम शेळके, सुभाष चेके, पुंजाजी मुजमुले, प्रदूम्न  सोनटक्के, दत्तू पाटील टेकाळे, शेषराव पाटील शेळके, कलीमसेठ जमादार, सादीक देशमुख, आत्माराम पाटील कुटे, सुरेश पाटील धंदर, सुखदेव नरोटे, रामदास शेळके, राजु शेळके, दिनकर टेकाळे, मुरली महाराज येवले, प्रताप जाधव, विठ्ठलराव सोळंके, राजु शेटे, भानदास पाटील घुबे, आत्माराम गाढे, संतोष परिहार यांनी सहभाग नोंदविला आहे. (प्रतिनिधी)

 
शेतकऱ्यांचे स्वातंत्र्य हिरावून घेतले-जाधव
एचटीबीटीच्या कापसाच्या वाणाला केंद्र सरकाने बंदी आणली असून शेतकऱ्यांचे स्वातंत्र्य हिरावून घेतल्याचा आरोप शेतकरी संघटनेचे नामदेवराव जाधव यांनी केला. शेतकऱ्यांनी शेतात कोणते पीक व वाण पेरायचे याचे स्वातंत्र्य शेतकºयांना असले पाहिजे, असे सांगूण जाधव म्हणाले की, प्रगत देशामध्ये जनुकीय परीवर्तीत केलेल्या मका, कापूस, तांदूळ, सोयाबीन या पिकांना परवानगी आहे. मात्र भारत सरकारने यावर बंदी आणली आहे. या वाणाच्या लागवडीमुळे उत्पादन खर्च कमी होवून उत्पन्नात वाढ होणार आहे. जगाच्या स्पर्धेत जग टिकायचे असेल तर शेतकºयांना तंत्रज्ञानाचे स्वातंत्र्य आवश्यक आहे. एकीकडे उत्पन्न दुप्पट करण्याची भाषा वापरायची तर दुसरीकडे जीएम बियाण्यावर बंदी आणून शेतकरी विरोधी धोरण राबवायचे हे आता शेतकरी सहन करणार नाहीत, असे मत शेतकरी नेते नामदेवराव जाधव यांनी व्यक्त केले. 
 

Web Title: Farmers planted HTBT cotton in Buldhana; Khedbhanga agitation in front of the Collector's office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.