शेतकर्‍यांनो आत्महत्या करू नका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2017 12:15 AM2017-08-21T00:15:29+5:302017-08-21T00:15:51+5:30

मेहकर: दरवर्षी दुष्काळाचे सावट, पावसाचे प्रमाण कमी-अधिक  होणे, पिकांच्या उत्पादनात घट होणे, पिकांना भाव नसणे आदी  संकटांमुळे शेतकरी बांधव चिंताग्रस्त झाले आहेत. दरवर्षी पिकांचे  उत्पादन कमी होत असल्याने शेतकर्‍यांवर कर्जाचा डोंगर वाढत  आहे. त्यामुळे शेतकरी बांधव हतबल होऊन आत्महत्या करतात;  मात्र आलेल्या संकटाला हिमतीने सामोरे जाऊन, संकटातून मार्ग  काढण्याचा प्रयत्न करावा, जीवनात अनेक  संकटे येत असतात;  मात्र आत्महत्या करणे हा अंतिम पर्याय नाही. त्यामुळे शेतकरी  बांधवांनो आत्महत्या करू नका, असे आवाहन  बाबुराव महाराज  नागोलकर यांनी केले.

Farmers do not commit suicide! | शेतकर्‍यांनो आत्महत्या करू नका!

शेतकर्‍यांनो आत्महत्या करू नका!

Next
ठळक मुद्देनागोलकर यांचे आवाहन प्रवचनातून ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’चा संदेशशेतकर्‍यांना मार्गदर्शन

लोकमत न्यूज नेटवर्क
मेहकर: दरवर्षी दुष्काळाचे सावट, पावसाचे प्रमाण कमी-अधिक  होणे, पिकांच्या उत्पादनात घट होणे, पिकांना भाव नसणे आदी  संकटांमुळे शेतकरी बांधव चिंताग्रस्त झाले आहेत. दरवर्षी पिकांचे  उत्पादन कमी होत असल्याने शेतकर्‍यांवर कर्जाचा डोंगर वाढत  आहे. त्यामुळे शेतकरी बांधव हतबल होऊन आत्महत्या करतात;  मात्र आलेल्या संकटाला हिमतीने सामोरे जाऊन, संकटातून मार्ग  काढण्याचा प्रयत्न करावा, जीवनात अनेक  संकटे येत असतात;  मात्र आत्महत्या करणे हा अंतिम पर्याय नाही. त्यामुळे शेतकरी  बांधवांनो आत्महत्या करू नका, असे आवाहन  बाबुराव महाराज  नागोलकर यांनी केले.
यावेळी त्यांनी अभंग प्रवचनातून ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’चा  संदेशदेखील देऊन शेतकर्‍यांना मार्गदर्शन करण्यात आले.  श्रावणमासानिमित्त मेहकर तालुक्यातील अंजनी बु. येथे दररोज  रात्री विठ्ठल-रुखमाई मंदिरात  बाबुराव महाराज नागोलकर,  भगवान महाराज लिखी, बळीराम महाराज अल्हाट यांचे प्रवचन  सुरू आहे. या प्रवचनातून हा संदेश व मार्गदर्शन करण्यात येत  आहे. प्रवचनाच्या माध्यमातून अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनमुक्ती,  कमी खर्चात शेती कशी करावी, कोणती बाजारपेठ पीक  विक्रीसाठी योग्य राहील, फळबागेविषयी माहिती, तसेच धार्मिक  प्रवचनही करण्यात येते. या कार्यक्रमाचा दररोज शेकडो भाविक,  शेतकरी महिला, लाभ घेतात. यावेळी सेवानवृत्त तालुका कृषी  अधिकारी मधुकर काळे हे सेवानवृत्त झाले असतानासुद्धा शे तकर्‍यांना वेळोवेळी मार्गदर्शन करीत आहेत. शेतकर्‍यांना येणार्‍या  अडीअडचणी मधुकर काळे प्रत्यक्ष गावात जाऊन शेतकर्‍यांशी  संवाद साधून सोडविण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे मधुकर काळे  यांचे कार्य पाहता त्यांचा गावकर्‍यांच्यावतीने सत्कार करण्यात  आला.
 या कार्यक्रमाला रमेश सावजी, वैराळ, धांडे, सिरसाट, शिवाजी  अल्हाट, पांडुरंग काळे, सुरेश अल्हाट, नवजीवन कनिष्ठ  महाविद्यालयाचे अध्यक्ष डॉ. भरत अल्हाट, शिवाजी अल्हाट,  नारायण नागोलकर, डॉ. वसंता नागोलकर, अर्जुन पिंपळे, डॉ.  वनस्कर, डॉ. पांडुरंग अल्हाट, प्रकाश खोडवे, नामदेव राऊत,  मदन नागोलकर,  मनोहर टोनपे, मोतीराम अल्हाट, दत्ता  नागोलकर, संजय जाधव, सुखदेव अल्हाट, यादव अल्हाट,  भागवत राऊत, रामभाऊ कांबळे, अरविंद जोशी उपस्थित होते.  कार्यक्रमाचे संचालन बाबुराव महाराज नागोलकर यांनी केले. तर  आभारप्रदर्शन विलास पायघन, किरण पारीस्कर यांनी केले.  कार्यक्रमाला महिला, पुरुष, भाविक व गावकरी मोठय़ा संख्येने उ पस्थित होते. 

Web Title: Farmers do not commit suicide!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.