रानडुकराच्या हल्यात शेतकरी जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2019 03:41 PM2019-06-11T15:41:18+5:302019-06-11T15:45:01+5:30

रानडुकाराने पाठीमागून येत अचानकपणे हल्ला चढविल्याने या हल्लात शेतकरी जखमी झाल्याची घटना पेन सावंगी शिवारातील शेतात १० जूनच्या सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली.

Farmer injured in wild pig attack | रानडुकराच्या हल्यात शेतकरी जखमी

रानडुकराच्या हल्यात शेतकरी जखमी

Next


चिखली : शेतातील कामात मग्न असलेल्या शेतकºयावर रानडुकाराने पाठीमागून येत अचानकपणे हल्ला चढविल्याने या हल्लात शेतकरी जखमी झाल्याची घटना पेन सावंगी शिवारातील शेतात १० जूनच्या सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली.
मान्सून उंबरठ्यावर आल्याने शेतकरी खरीपाच्या तयारीला लागले आहेत. यासाठी भल्या पहाटेपासून शेतशिवारात  शेतकरी व शेजमजुर काम करताना दिसून येत आहेत. यामध्ये पेन सावंगी येथील शेतकरी उद्धवराव मारोती अंभोरे हे सकाळी आपल्या शेतात काम करत असताना अचानक रानडुकरे पाठीमागून येवून त्यांच्यावर हल्ला चढविला. अचानकपणे झालेल्या या हल्ल्याने भांबावलेले शेतकरी उध्दवराव अंभोरे यांनी आरडा-ओरड केली असता शेताला लागून असलेल्या शेतातून त्यांचे भाऊ शिवाजी आंभोरेंनी धावत येवून रानडुकरावर काठीने मारून त्यांना हल्ल्यातून सोडविले. या हल्ल्यात उद्धवराव आंभोरे यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांना तातडीने चिखली येथील ग्रामीण रूग्णालयात हलविण्यात आले. मात्र, ग्रामीण रूग्णालयात उपचाराची योग्य सुविधा उपलब्ध नसल्याचे पाहून नातेवाईकांनी त्यांनी शहरातील खासगी रूग्णालात हलविले असून तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Farmer injured in wild pig attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.