मोजणी न करताच महामार्गाचे विस्तारीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2019 02:40 PM2019-01-12T14:40:04+5:302019-01-12T14:40:13+5:30

खामगाव : शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचे विस्तारीकरण दिशाहिन पध्दतीने सुरू असतानाच, रस्त्याच्या मोजणी संदर्भातील भूमिअभिलेखच्या पत्राला  भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडून दुर्लक्षीत करण्यात येत आहे.

Expansion of the highway without counting | मोजणी न करताच महामार्गाचे विस्तारीकरण

मोजणी न करताच महामार्गाचे विस्तारीकरण

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

खामगाव : शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचे विस्तारीकरण दिशाहिन पध्दतीने सुरू असतानाच, रस्त्याच्या मोजणी संदर्भातील भूमिअभिलेखच्या पत्राला  भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडून दुर्लक्षीत करण्यात येत आहे. या रस्त्याच्या मोजणी संदर्भातील कोणत्याही प्रकारच्या रक्कमेचा भरणा अद्यापपर्यंत करण्यात आला नाही. ‘न्हाई’कडून केवळ कागदोपत्री पत्रव्यवहाराद्वारे मोजणीचा घाट घालण्यात येत असल्याने, भविष्यात हा रस्ता वादाच्या भोवºयात सापडणार असल्याचे संकेत आहेत.

खामगाव शहरातून जाणाºया राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-६ मध्ये २९६+००० ते ३०३+२०० पर्यंतचे मोजणी शुल्क कळविण्यासाठी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधीकरणाकडून उप अधीक्षक भूमिअभिलेख, खामगाव यांच्याशी २४ डिसेंबर रोजी पत्रव्यवहार करण्यात आला. त्याअनुषंगाने भूमि अभिलेख कार्यालयांकडून ०१ जानेवारी २०१९ च्या पत्रानुसार तातडीचे मोजणी शुल्क १५ लाख ४८ हजार रुपये आणि अति तातडीचे मोजणी शुल्क ३ लाख ८७ हजार रुपये असे एकुण १९ लक्ष ३५ हजार रुपयांचा भरणा करण्याचे सुचविले. मात्र, याबाबीला तब्बल ११ दिवसांचा कालावधी लोटल्यानंतरही अद्यापर्यंत शुल्क भरण्यासंदर्भात कोणतीही उपाययोजना करण्यात आली नाही. त्यामुळे राष्ट्रीय महामार्गाच्या विस्तारीकरणाचे काम भूमिअभिलेख विभागाच्या मोजणीशिवाय सुरू असल्याची धक्कादायक बाब अधोरेखीत झाली आहे. दरम्यान, विकमसी चौक ते टिळक पुतळा आणि बस स्थानक चौक ते टॉवर चौक, टॉवर चौक ते नांदुरा रोडपर्यंत या रस्त्याची मध्यरेषा ठिकठिकाणी बदलण्यात येत आहे. टिळक पुतळ्याजवळील एका हॉटेल व्यावसायिकाच्या लाभासाठी मध्यरेषा बदलण्यात आल्याची ओरड होत असतानाच, जलंब नाक्यासमोरही काही व्यावसायिकांना लाभ पोहोचविण्यासाठी मध्य रेषा बदलण्यात आल्याची चर्चा आहे.

 महामार्गाच्या दस्तऐवजाचा घोळ!

शहरातून जाणाºया रस्त्याचे विस्तारीकरण करताना उपलब्ध नझुल शीटच्या आधारे सीमांकन करण्यात येत आहे. तसेच ‘न्हाई’कडे या रस्त्याच्या हद्दीत करण्यात आलेल्या पक्क्या बांधकामाची यादी आणि दस्तवेज उपलब्ध नाही, अशी माहिती माहिती अधिकारात उघड झाली आहे. त्यामुळे या रस्त्याच्या दस्तऐवजातील घोळही चर्चेचा विषय बनला आहे.

 

कंत्राटदाराकडूनच मोजणी!

रस्त्याच्या चौपदरीकरणाचा कंत्राट जान्दू कंन्ट्रक्शन कंपनीला देण्यात आला आहे. या कंपनीकडूनच रस्त्याचे विस्तारीकरण करण्यात येत असून, कंत्राटदाराकडून मोजणी करून रस्त्याचे काम केले जात आहे. 

 

२१ शीटची मोजणी अपूर्ण!

राष्ट्रीय महामार्गावरील २१ शीटवरील  अनेक प्लॉटची मोजणी न करताच या रस्त्याच्या कामास सुरूवात करण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. एकीकडे पत्रव्यवहार आणि दुसरीकडे रस्त्याचे काम असाच काहीसा प्रकार खामगाव सुरू असल्याचे दिसून येते.


 

 रस्त्याच्या मोजणीसंदर्भातील शुल्क आणि अवधी संदर्भात ‘न्हाई’शी पत्रव्यवहार करण्यात आला. भूमि अभिलेख कार्यालयाकडून पत्रव्यवहार व सर्व प्रक्रीया पार पाडण्यात आली. मात्र, अद्यापपर्यंत ‘न्हाई’कडून कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. ‘न्हाई’ला मोजणीसंदर्भातील शुल्क खामगाव उप विभागीय कार्यालयातच भरावे लागणार असून, विभागीय भूमिअभिलेख कार्यालयाचा याठिकाणी सूतराम संबध नाही.

- रविंद्र खरोटे, उप भूमिलेख अधिकारी, खामगाव.


 राष्ट्रीय महामार्ग पूर्वापार आहे. पीडब्ल्यूकडून हस्ते-परस्ते आमच्याकडे आला. रस्त्याचे ओरिजनल दस्तवेज आमच्याकडे उपलब्ध नाहीत. पंरतू लॅन्ड रेकॉर्ड कडे ओरीजनल दस्तवेज असतात. त्यामुळे भविष्यातील वाद टाळण्यासाठी भूमिअभिलेखकडून मोजणी केली जात आहे. मात्र, भूमिअभिलेखकडून मोजणी करणे अजिबात  अभिप्रेत नाही.

-विलास ब्राम्हणकर, प्रकल्प संचालक, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधीकरण

Web Title: Expansion of the highway without counting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.