बायोमॅट्रिककडे दुर्लक्ष करणाऱ्या कर्मचाऱ्यांना चाप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2018 06:25 PM2018-07-06T18:25:14+5:302018-07-06T18:27:16+5:30

 ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील कर्मचाऱ्यांची बायोमॅट्रिकवर नोंद होत नसल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी अशा कर्मचाऱ्यांवर कार्यवाहीचे आदेश देवून  बायोमॅट्रिकची सक्ती केली आहे.

employees who ignore biometrics will pay for it | बायोमॅट्रिककडे दुर्लक्ष करणाऱ्या कर्मचाऱ्यांना चाप

बायोमॅट्रिककडे दुर्लक्ष करणाऱ्या कर्मचाऱ्यांना चाप

Next
ठळक मुद्देअधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वाढत्या गैरहजेरीमुळे शासनाने बायोमॅट्रीक यंत्रणा बंधनकारक केली आहे.ग्रामसेवक ग्रामपंचायत कार्यालयात उपस्थित रहात नाहीत, अनेक दिवस ते ग्रामपंचायतीकडे फिरकतच नाहीत. ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील अधिकारी व कर्मचाºयांना बायोमॅट्रीकची सक्ती केली आहे.


- ब्रम्हानंद जाधव
बुलडाणा : तीन हजार पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची बायोमॅट्रिक मशीनद्वारे येण्याची व जाण्याची नोंद करणे बंधनकारक आहे. मात्र  जिल्ह्यात  ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील कर्मचाऱ्यांची बायोमॅट्रिकवर नोंद होत नसल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी अशा कर्मचाऱ्यांवर कार्यवाहीचे आदेश देवून  बायोमॅट्रिकची सक्ती केली आहे. त्यामुळे आता बायोमॅट्रिकपासून दूर पळणाºया कर्मचाऱ्यांवर चाप बसणार आहे. 
ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात येणाºया  अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वाढत्या गैरहजेरीमुळे शासनाने बायोमॅट्रीक यंत्रणा बंधनकारक केली आहे. त्यासाठी ग्रामविकास विभागाच्यावतीने जिल्हा परिषदेला केलेल्या सूचनेनुसार जिल्ह्यात प्रामुख्याने तीन हजारांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील जि.प. शाळेमधील शिक्षक, आरोग्य विभाग, पशुसंवर्धन विभाग, ग्रामसेवक यांच्यासह अन्य कर्मचारी व अधिकाºयांनीही दररोज बायोमेट्रिक यंत्रावरच हजेरी  द्यावी, असे सांगितले होते. शासकीय अधिकारी व कर्मचाºयांची गैरहजेरी टाळण्यासाठी  बायोमॅट्रिक मशीनची उपलब्धता करून घेतल्यानुसार ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात सर्व अधिकारी व कर्मचाºयांनी प्रत्येक दिवसाची बायोमॅट्रिक मशीनमध्ये कार्यालयात येण्याची व जाण्याची नोंद करणे बंधनकारक आहे. त्यानुसार ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील सर्व कार्यालयातील अधिकारी व  कर्मचाºयांनी १ एप्रिल २०१८ पासून हजेरीसाठी बायोमेट्रिक मशिन दिल्या आहेत. परंतू, जिल्ह्यातील ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील  कार्यरत अधिकारी व कर्मचारी बायोमॅट्रिक मशीनवर नोंद करत नाहीत. त्यामुळे ग्रामसेवक ग्रामपंचायत कार्यालयात उपस्थित रहात नाहीत, अनेक दिवस ते ग्रामपंचायतीकडे फिरकतच नाहीत, कर्मचाºयांच्या अनुपस्थितीमुळे अनेक कामकाज खोळंबले आहे, अशी सतत ओरड होते. अशा दांडी बहाद्दर कर्मचाºयांना आळा घालण्यासाठी ५ जुलै रोजी जिल्हाधिकारी व जि.प.मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील अधिकारी व कर्मचाºयांना बायोमॅट्रीकची सक्ती केली आहे. तसेच जे अधिकारी व कर्मचारी बायोमॅट्रिकवर नोंद करणार नाहीत, त्यांच्यावर संबंधित कार्यालयप्रमुखांनी प्रशासकीय कार्यवाही करावी, असे आदेश दिले आहेत. 

 
बायोमॅट्रिक गटविकास अधिकाऱ्यांच्या खांद्यावर
ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या हजेरीसाठी बायोमॅट्रिक यंत्रणा बंधनकारक करण्यात आल्यानंतर त्याबाबत संबंधीत जिल्हास्तरावरील व तालुकास्तरावरील सर्व यंत्रणांना दखल घ्यावी लागणार आहे. तसेच यासंदर्भात गटविकास अधिकाऱ्यां ना तालुकास्तरावरील व ग्रामस्तरावरील सर्व कार्यालयांना तात्काळ आदेश देवून वेळोवेळी आढावा घ्यावा लागणार आहे. बायोमॅट्रिक यंत्रणेचा सर्व अहवाल पाठविण्याचा जबाबदारी गटविकास अधिकाऱ्यांच्या खांद्यावर दिली आहे.  

Web Title: employees who ignore biometrics will pay for it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.