लोणार नगराध्यक्ष पदासाठी पंचरंगी लढतीचे चित्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2019 03:12 PM2019-03-19T15:12:21+5:302019-03-19T15:12:27+5:30

लोणार : नगर पालिका निवडणुकीच्या प्रचाराला सुरूवात झाली असून, पालिका निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी पंचरंगी लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Election of Lonar municipality counsil | लोणार नगराध्यक्ष पदासाठी पंचरंगी लढतीचे चित्र

लोणार नगराध्यक्ष पदासाठी पंचरंगी लढतीचे चित्र

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
लोणार : नगर पालिका निवडणुकीच्या प्रचाराला सुरूवात झाली असून, पालिका निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी पंचरंगी लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
अनुसूचित जाती महिलासाठी राखीव असलेल्या नगराध्यक्ष पदासाठी जोरदार प्रचाराच्या तोफा १५ मार्च पासून सुरु झाल्याने निवडणूक चुरशीची होणार आहे. या निवडणुकीत काँग्रेसच्या पूनम पाटोळे, शिवसेनेच्या सुनिता राजगुरू, रासप च्या सुवर्णा मोरे, भारिप च्या मनिषा वाघमारे व अपक्ष अयोध्या पसरटे यांच्यामध्ये लोणार नगर परिषद नगराध्यक्ष पदासाठी लढत होत आहे. आठ प्रभागातील १७ जागांसाठी ५८ उमेदवार नगरसेवक पदासाठी निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
या निवडणुकीसाठी १८ हजार ७३७ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे. या मध्ये महिला मतदार ९ हजार ९० तर पुरुष मतदार ९ हजार ६४७ आहेत. दहा इमरतीमधील २६ बुधवर मतदान घेण्यात येणार आहे. १४ मार्च रोजी चिन्ह वाटप झाल्याने १५ मार्च पासून प्रचाराला सुरुवात झाली आहे. तर २२ मार्च रोजी प्रचाराच्या तोफा थंडावणार असल्याने उमेदवारांनी रात्रीचाहि दिवस करीत प्रचाराचा धडाका सुरु केला आहे. २४ मार्च रोजी मतदान होऊन २५ मार्च रोजी मतमोजणी व निकाल जाहीर होईल.
काँग्रेस व राष्ट्रवादी युती झाल्याने राष्ट्रवादी ला दोन जागा देण्यात आल्या होत्या. त्यापैकी एका उमेदवाराने अर्ज मागे घेतल्याने ऐनवेळेवर अपक्ष उमेदवाराला पूरस्कृत करण्यात आले आहे. पालिका निवडणुकीत रंगत वाढली आहे.
(प्रतिनिधी)

Web Title: Election of Lonar municipality counsil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.