‘स्व’पासून दुरावल्यानेच मनुष्याची जीवनात अधोगती! -  शकुंतला दीदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2019 06:01 PM2019-06-08T18:01:31+5:302019-06-08T18:43:49+5:30

प्रजापिता ब्रम्हकुमारी केंद्राच्या शकुंतला दीदी यांच्याशी साधलेला संवाद... 

Due to the self-repetition man going toward - Shakuntala didi | ‘स्व’पासून दुरावल्यानेच मनुष्याची जीवनात अधोगती! -  शकुंतला दीदी

‘स्व’पासून दुरावल्यानेच मनुष्याची जीवनात अधोगती! -  शकुंतला दीदी

Next

अनिल गवई।
लोकमत न्यूज नेटवर्क
 खामगाव: आजच्या आधुनिक युगात प्रत्येकाच्या अपेक्षा आणि इच्छा वाढल्यात. त्यामुळे मनुष्याच्या आयुष्यात समाधान नाही. भौतिक सुख आणि स्पर्धांत्मक परिस्थितीमुळं मनुष्य स्वत:शीही वैरत्व पत्करत आहे. मात्र, अधात्मामुळे स्व:ची ओळख होते. तसेच अधात्म हेच सर्व विकार आणि वाईट गोष्टीपासून मुक्त करते.प्रजापिता ब्रम्हकुमारी केंद्राच्या शकुंतला दीदी यांच्याशी साधलेला संवाद... 
निकोप समाज निर्मितीसाठी काय करणे अपेक्षीत आहे? 
अपेक्षा आणि इच्छा वाढीस लागल्याने मनुष्य नैराश्य आणि तणावाकडे जात आहे. ही वस्तुस्थिती आहे. मात्र, प्रत्येकाने आपल्या जीवनात प्रेम...आदर आणि नि:स्वार्थ भावनेची देवाण-घेवाण केल्यास, निकोप समाजाची निर्मिती सहज शक्य आहे. 
आपल्या मते जगातील सर्वांत दु:खी व्यक्ती कोण?  
मनुष्याला आपल्या जीवनात नानाविध दु:ख आहेत. आयुष्यभर वेगवेगळ्या दु:खामुळे मनुष्य व्यथीत राहतो. मनाच्या विपरीत घडलं की, साध्या साध्या गोष्टीने निराश होतो.  मनुष्याच्या आयुष्यात अनेक दु:ख असले तरी,  रिकामे ‘मन’असलेला व्यक्ती या जगात सर्वात दु:खी असल्याचे आपले प्रामाणिक मत आहे.
सुख-समाधान प्राप्तीसाठी काय केलं पाहीजे? 
अंहकार मानवाचा सर्वातमोठा शत्रू आहे. शास्त्राने तर अंहकाराला दुराचारी कंसाची उपमा दिली आहे. सुख आणि समाधान प्राप्तीसाठी प्रत्येकाने आपल्या जीवनातील अंहकाररूपी कंसाला आपल्यापासून दूर ठेवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला पाहीजे. सर्व विकारांना शत्रु मानण्यात येते. आपल्या अंगी असलेले विविध विकार हे शत्रु असले तरी, जीवनात माणसाचा कुणीही शत्रु नसला पाहीजे. विकारांचा त्याग केल्या मनुष्य सुखी आहे.
चिंता आणि चिता या दोन्हीत केवळ एका अनुस्वाराचा फरक आहे. मात्र, दोघांचेही कार्य समान आहे. चिंता ही माणसाला जीवंतपणी, तर चिता ही मेल्यावर जाळत असते. चिंतेमुळे दु:खाची तीव्रता कितीतरी पटीने वाढत जाते. म्हणून, माणसाने आपल्या आयुष्यात चिंतेला दोन हात लांबच ठेवावे.

 
समाजातील वाढत्या कलहास जबाबदार कोण?
सद्भावना आणि शिवभावना नाहीशी झाल्यामुळे समाजात कलह वाढीस लागले आहेत. क्षणिक स्वार्थ आणि भौतिक सुखासाठी मनुष्य हपापल्यानेच घरांघरांमध्ये गृहक्लेश वाढीस लागलेत. मनुष्य स्व:तपासूनच दूर गेला असून तो भरकटत आहे. आदर्श बाजूला ठेवल्यानेच समाजात अनेक वाईट घटना घडताहेत. ‘पूत कपूत होते है; माता कुमाता नाही होती!’ मात्र, सद्यस्थितीत  स्वत:च्या स्वार्थासाठी अनेक ठिकाणी आई मुलाच्या जीवावर उठल्याचेही दिसून येते. ही बाब समाजासाठी घातक ठरतेय!

Web Title: Due to the self-repetition man going toward - Shakuntala didi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.