देऊळगांव राजा : कब्रस्थानातील समस्या मार्गी लावण्यासाठी शिवसंग्रामचे उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2018 01:59 PM2018-01-02T13:59:23+5:302018-01-02T14:04:42+5:30

देऊळगांव राजा :  येथील मुस्लिम कब्रस्थानातील विविध समस्या मार्गी लावण्यासाठी नगर पालिका विरोधात सोमवारी शिवसंग्राम संघटनेचे तालुका अध्यक्ष राजेश इंगळे व तालुका संघटक जहीर खान पठान यांनी उपोषणास सुरूवात केली आहे.

Deulgaon Raja: Fasting of Shiva Sangram to solve the problems in the graveyard | देऊळगांव राजा : कब्रस्थानातील समस्या मार्गी लावण्यासाठी शिवसंग्रामचे उपोषण

देऊळगांव राजा : कब्रस्थानातील समस्या मार्गी लावण्यासाठी शिवसंग्रामचे उपोषण

Next
ठळक मुद्देसमस्या मार्गी लावण्यासाठी शिवसंग्राम संघटनेच्या वतीने १५ डिसेंबर रोजी  मुख्याधिकारी अजय कुरवाड़े यांना निवेदन दिले होते. परंतु सदर निवेदनाची नगरपालिका प्रशासनाने दखल न घेतल्यामुळे १ जानेवारी सकाळी ११ वाजे पासून उपोषण सुरू केले आहे.मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण सुरू ठेवण्याचा इशारा शिवसंग्राम संघटनेचे तालुका अध्यक्ष राजेश इंगळे व तालुका संघटक जाहिर खान पठान यांनी दिला आहे.

देऊळगांव राजा :  येथील मुस्लिम कब्रस्थानातील विविध समस्या मार्गी लावण्यासाठी नगर पालिका विरोधात सोमवारी शिवसंग्राम संघटनेचे तालुका अध्यक्ष राजेश इंगळे व तालुका संघटक जहीर खान पठान यांनी उपोषणास सुरूवात केली आहे. देऊळगांव राजा येथील मुस्लिम कब्रस्थान मध्ये विजेची व्यवस्था नाही. त्यामुळे विजेची तात्काळ व्यवस्था करावी, कब्रस्थान मध्ये टिनपत्राचे शेड असून ते  मोड़कळीस आले आहे. त्यामुळे टिनशेड त्वरित दुरुस्त करण्यात यावे.तसेच कब्रस्थान मध्ये नियमित पाण्याची व देखभालीसाठी नगरपालिके मार्फत दोन सफाई कामगरांची नेमणूक करावी व कब्रस्थानात रस्त्याची व्यवस्था करावी आदी समस्या मार्गी लावण्यासाठी शिवसंग्राम संघटनेच्या वतीने १५ डिसेंबर रोजी  मुख्याधिकारी अजय कुरवाड़े यांना निवेदन दिले होते. त्या निवेदनात ३० डिसेंबर पर्यंत समस्या मार्गी न लगल्यास १ जानेवारी २०१८ पासून नगर पालिका विरोधात पोषण आंदोलन करण्यात येईल, असा इशारा  देण्यात आला होता. परंतु सदर निवेदनाची नगरपालिका प्रशासनाने दखल न घेतल्यामुळे १ जानेवारी सकाळी ११ वाजे पासून शिवसंग्राम संघटनेचे तालुका अध्यक्ष राजेश इंगळे व तालुका संघटक जाहिर खान पठान यांनी उपोषण सुरू केले आहे. यावेळी उपोषण मंडपास राष्टवादी कॉंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ.रामप्रसाद शेळके, तालुका अध्यक्ष राजू सिरसाट, सदाशिव मुंढे, समाजवादीचे शाकिर लाला, अजमद खान, मनसेचे कदीर शेख, दीपक जावळे यांनी भेट देऊन आपला पाठिंबा दिला. यावेळी नगराध्यक्षा सुनिता शिंदे व नगरसेवक यांनी उपोषणकर्त्यांसोबत चर्चा केली, परंतु चर्चा निष्फल ठरली असून मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण सुरू ठेवण्याचा इशारा शिवसंग्राम संघटनेचे तालुका अध्यक्ष राजेश इंगळे व तालुका संघटक जाहिर खान पठान यांनी दिला आहे.

Web Title: Deulgaon Raja: Fasting of Shiva Sangram to solve the problems in the graveyard

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.