देऊळगावराजा : एटीएम फोडताना चोरटे सीसी कॅमेर्‍यात कै द; रोकड नसल्याने चोरी फसली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2018 12:47 AM2018-01-10T00:47:44+5:302018-01-10T00:48:44+5:30

देऊळगावराजा: येथील जुना जालना मार्गावर असलेले महाराष्ट्र बँकेचे एटीएम फोडून कॅश लुटण्याचा प्रयत्न झाल्याचा प्रकार ९ जानेवारी पहाटे उघडकीस आला. तब्बल १८ मिनिटे दोन चोरटे एटीएममध्ये असल्याचे सीसी कॅमेर्‍यात कैद झाले असून, रोकड नसल्याने चोरट्यांचा प्रयत्न फसला.

Deulgaavaraja: Cracking the thief's cc camera while breaking the ATM; Due to lack of cash theft! | देऊळगावराजा : एटीएम फोडताना चोरटे सीसी कॅमेर्‍यात कै द; रोकड नसल्याने चोरी फसली!

देऊळगावराजा : एटीएम फोडताना चोरटे सीसी कॅमेर्‍यात कै द; रोकड नसल्याने चोरी फसली!

Next
ठळक मुद्देजुना जालना मार्गावर महाराष्ट्र बँकेचे एटीएम फोडून कॅश लुटण्याचा प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्क
देऊळगावराजा: येथील जुना जालना मार्गावर असलेले महाराष्ट्र बँकेचे एटीएम फोडून कॅश लुटण्याचा प्रयत्न झाल्याचा प्रकार ९ जानेवारी पहाटे उघडकीस आला. तब्बल १८ मिनिटे दोन चोरटे एटीएममध्ये असल्याचे सीसी कॅमेर्‍यात कैद झाले असून, रोकड नसल्याने चोरट्यांचा प्रयत्न फसला.
स्थानिक बँक ऑफ महाराष्ट्रचे हे एटीएम आहे. रात्री १२ वाजून ५७ मिनिटाला एटीएममध्ये दोन युवकांनी प्रवेश केला. यातील निळय़ा रंगाच्या टोपी, जरकीन घातलेल्या युवकाने लोखंडी पहार सीसी कॅमेर्‍यावर चारदा मारली व बाहेर निघून गेला त्या नंतर दुसर्‍या युवकाने सदर पहार ए.टी.एम.मशीनीच्या वरच्या बाजूने मारुन मशीन फोडण्याचा प्रयत्न केला थोड्या वेळेनंतर मशीन समोरच्या दिशेने उघडली मात्र त्यात कॅश नसल्याने त्यांची झुंज अपयशी ठरली. सदर १८ मिनिटाचा थरार ए.टी.एम.च्या कॅबीनमध्ये लावलेल्या सी.सी.टि.व्ही.मध्ये कैद झाला. 
दरम्यान पहाटे साडेपाचच्या सुमारास ए.टी.एम.मधील अस्वच्छता स्वच्छ करण्यासाठी हातात झाडू घेवून आलेल्या व्यक्तीला ए.टी.एम.फोडलेल्या अवस्थेत दिसला, त्यावेळी सदर घटना उघडकीस आली. सकाळी महाराष्ट्र बँकेचे शाखा अधिकारी डि.आर.काळे यांनी ए.टी.एमची पाहणी करुन वरीष्ठ अधिकार्‍यांना सदर प्रकाराबाबत अवगत केले. तद्नंतर लेखी तक्रार देण्यासाठी पोलिसात गेल्यावर सि.सी.टी.व्ही.फुटेज घेवून यानंतर गुन्हा दाखल करु असे पोलिस सुत्रांकडून त्यांना सांगितले गेले. वृत्त लिहेपर्यंत सदर घटनेविषयी गुन्हा पोलिसात नोंदविण्यात आला नव्हता. दरम्यान कॅश संपल्याने एटीएम फोडल्यावरही चोरट्यांना एटीएममध्ये नोटा आढल्या नाही.
 

Web Title: Deulgaavaraja: Cracking the thief's cc camera while breaking the ATM; Due to lack of cash theft!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.