वीज अंगावर पडल्याने महिलेचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2018 02:00 PM2018-06-23T14:00:25+5:302018-06-23T14:02:22+5:30

धामणगाव बढे : शेतात काम करीत असताना अचानक वीज कोसळल्याने महिला ठार झाल्याची घटना मोताळा तालुक्यातील आव्हा येथे २३ जून रोजी सकाळी १० वाजता घडली.

Death of a woman due to lightning | वीज अंगावर पडल्याने महिलेचा मृत्यू

वीज अंगावर पडल्याने महिलेचा मृत्यू

Next
ठळक मुद्देआव्हा येथील विमल श्रीराम घोंगटे (वय ४५) ही महिला इतर महिलांसह शेलगाव शिवारातील दुसºयाच्या शेतात कपाशीचे निंदण करण्यासाठी गेली होती.अचानक आकाशात विजेच्या कडकडाट होवून विमल श्रीराम घोंगटे यांच्या अंगावर वीज कोसळली व त्यात विमल घोंगटे जागीच ठार झाल्या.मृतक महिलेची आर्थिक परिस्थिती अत्यंत हालाखीची असून पती नेहमी आजारी असतात.

धामणगाव बढे : शेतात काम करीत असताना अचानक वीज कोसळल्याने महिला ठार झाल्याची घटना मोताळा तालुक्यातील आव्हा येथे २३ जून रोजी सकाळी १० वाजता घडली. आव्हा येथील विमल श्रीराम घोंगटे (वय ४५) ही महिला इतर महिलांसह शेलगाव शिवारातील दुसºयाच्या शेतात कपाशीचे निंदण करण्यासाठी गेली होती. यावेळी शेतात सर्व महिला काही ठराविक अंतरावर काम करीत होत्या. यावेळी अचानक आकाशात विजेच्या कडकडाट होवून विमल श्रीराम घोंगटे यांच्या अंगावर वीज कोसळली व त्यात विमल घोंगटे जागीच ठार झाल्या. सदर मृतक महिलेची आर्थिक परिस्थिती अत्यंत हालाखीची असून पती नेहमी आजारी असतात. तर दोन मुले असून कामानिमित्त ते २२ जून रोजी पुणे येथे गेले आहेत. या घटनेची माहिती मिळताच धामणगाव बढे पोलिस स्टेशनच्या ठाणेदार मालती कायटे यांनी आपल्या पथकासह घटनास्थळी धाव घेवून पंचनामा केला.

Web Title: Death of a woman due to lightning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.