ट्रकच्या धडकेत खामगाव येथील वारकर्‍याचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2018 03:42 PM2018-06-15T15:42:18+5:302018-06-15T15:42:18+5:30

खामगाव:- ट्रकच्या धडकेत वारकर्‍याचा मृत्यू झाल्याची घटना आज दि. 15 जून रोजी सकाळी 6.30 वाजताच्या सुमारास शेगाव रोडवरील माऊली कॉलेज नजिक घडली.

Death of Warkari in Khamgaon under truck | ट्रकच्या धडकेत खामगाव येथील वारकर्‍याचा मृत्यू

ट्रकच्या धडकेत खामगाव येथील वारकर्‍याचा मृत्यू

Next
ठळक मुद्देवारकरी आशिष रमेश मार्के (30) हे आज 15 जून रोजी पहाटेच्या सुमारास शेगाव वारीसाठी घरुन पायी जात होते. सकाळी 6.30 वाजताच्या सुमारास माऊली इंजिनिअरींग कॉलेजजवळ ट्रक क्र. एमएच 30 एबी 2484 ने त्यांना चिरडले. ट्रकचे चाक डोक्यावरुन गेल्याने त्यांचा चेहरा छिन्नविछिन्न झाला होता.


खामगाव:- ट्रकच्या धडकेत वारकर्‍याचा मृत्यू झाल्याची घटना आज दि. 15 जून रोजी सकाळी 6.30 वाजताच्या सुमारास शेगाव रोडवरील माऊली कॉलेज नजिक घडली.
    येथील घाटपुरी रोडवरील रंभाजी कॉलनीमधील रहिवासी तसेच हिंदुस्थान लिव्हरमधील कामगार वारकरी आशिष रमेश मार्के (30) हे आज 15 जून रोजी पहाटेच्या सुमारास शेगाव वारीसाठी घरुन पायी जात असतांना सकाळी 6.30 वाजताच्या सुमारास माऊली इंजिनिअरींग कॉलेजजवळ ट्रक क्र. एमएच 30 एबी 2484 ने त्यांना चिरडले. ट्रकचे चाक डोक्यावरुन गेल्याने त्यांचा चेहरा छिन्नविछिन्न झाला होता. त्यांच्या खिशातील साहित्यावरुन त्यांची ओळख पटली असता त्यांचे त्यांचे नातेवाईक शेगाव येथील सईबाई मोटे सामान्य रुग्णालयात पोहचले होते. त्यांच्या पश्‍चात आई-वडील, पत्नी व 4 वर्षीय मुलगी आहे. सदर अपघाताची माहिती मिळताच शेगाव ग्रामीण पोस्टेचे ठाणेदार सुनिल हुड दाखल झाले होते.

Web Title: Death of Warkari in Khamgaon under truck

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.