सद्याचे सरकार भांडवलदारांचो हित जोपासणारे आणि थापाडे - रघुनाथदादा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2017 12:36 AM2017-11-21T00:36:55+5:302017-11-21T00:41:54+5:30

सत्तास्थानी असलेले प्रत्येक राज्यकर्ते हे भांडवलदारांचे हित जोपासत  असून, सद्यस्थितीतील सरकार हे तर थापाडे सरकार आहे. अशी घणाघाती टीका  शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी २0 नोव्हेंबर रोजी स्थानिक  विश्राम भवनावर आयोजित पत्रकार परिषदेत केली.

The current government is interested in capitalists' interests and Thapade - Raghunathadada | सद्याचे सरकार भांडवलदारांचो हित जोपासणारे आणि थापाडे - रघुनाथदादा

सद्याचे सरकार भांडवलदारांचो हित जोपासणारे आणि थापाडे - रघुनाथदादा

Next
ठळक मुद्देराज्यकर्ते भांडवलदारांचे जोपासतात हितसरसगट कर्जमाफी देण्याची अँड. मोरेंची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
मलकापूर : सत्तास्थानी असलेले प्रत्येक राज्यकर्ते हे भांडवलदारांचे हित जोपासत  असून, सद्यस्थितीतील सरकार हे तर थापाडे सरकार आहे. अशी घणाघाती टीका  शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी २0 नोव्हेंबर रोजी स्थानिक  विश्राम भवनावर आयोजित पत्रकार परिषदेत केली.
याप्रसंगी सत्यशोधक शेतकरी संघाचे किशोर ढमाले, शेतकरी संघटनेचे विदर्भ  प्रमुख दिनकर दाभाडे, बळीराजा शेतकरी संघाचे प्रदेशाध्यक्ष गणेशकाका जगताप,  नंदुरबारचे जिल्हाध्यक्ष उमाकांत पाटील, सुकाणू समिती राज्य अध्यक्ष कैलास  खांडबहाले व शेतकरी नेते अँड. साहेबराव मोरे आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.  वर्तमान स्थितीत शेतकर्‍यांना भयावह त्रास उद्भवत आहे. शासनाकडून तर शे तकर्‍यांची क्रुर थट्टा केल्या जात आहे. कर्जमुक्तीच्या नावाखाली शेतकर्‍यांची  फसवणूक होत आहे. या धर्तीवर शेतकर्‍यांच्या भावना जाणून घेण्याकरिता अभ्यास  दौर्‍याची ही चळवळ उभारली असून, त्या अनुषंगाने सबंध राज्यभर या चळवळीद्वारे  शेतकर्‍यांशी संवाद साधल्या जाणार आहे व त्यानंतरच पुढील लढा उभारल्या  जाईल, अशी माहिती रघुनाथदादा पाटील यांनी दिली. दरम्यान, उपस्थित शेतकरी  नेत्यांनीसुद्धा सरकारच्या चुकीच्या धोरणांवर अभ्यासपूर्णरीत्या ताशेरे ओढले.   अँड. साहेबराव मोरे यांनी कर्जमुक्ती योजना ही फसवी असून, या योजनेला देण्यात  आलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव वगळण्यात यावे,  अथवा सरसकट  कर्जमुक्ती द्यावी, जेणे करून छत्रपतींचा अनादर होणार नाही, असे मत मांडले. या प्रसंगी भाई अशांत वानखेडे, श्याम राठी, हितेश पाटील, मंगला पाटील, एस.पी.  संबारे, नवृत्ती तांबे, दिनकर पाटील, संगीता गांगुर्डे,  सुरेश पाटील, प्रल्हाद ढोले,  कैलास काळे, ज्ञानदेव तायडे उपस्थित होते. 

Web Title: The current government is interested in capitalists' interests and Thapade - Raghunathadada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.