नगरसेवक राकेश राणासह चार जणांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2017 01:08 AM2017-10-17T01:08:58+5:302017-10-17T01:09:06+5:30

खामगाव: पैशाच्या वादातून मारहाण व सावकारीप्रकरणी नगरसेवक राकेश राणासह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Corporator Rakesh Rana and four others | नगरसेवक राकेश राणासह चार जणांवर गुन्हा दाखल

नगरसेवक राकेश राणासह चार जणांवर गुन्हा दाखल

Next
ठळक मुद्देपैशाच्या वादातून मारहाण व सावकारी प्रकरण

लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: पैशाच्या वादातून मारहाण व सावकारीप्रकरणी नगरसेवक राकेश राणासह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 मिळालेल्या माहितीनुसार अकबरखान हा काही महिन्यापूर्वी राकेश राणा यांच्याकडे काम करीत असे. त्यावेळी अकबरखान याने काही खासगी कामानिमित्त राकेश राणा यांच्याजवळून १५ हजार रुपये कर्ज घेतले होते. यानंतर रविवारी १५ ऑक्टोबर रोजी दुपारी मद्यपान करून तो गौरव टेन्ट हाऊसमध्ये आला होता. यावेळी त्याने गौरव राणा याला आणखी पैसे मागितले असता मागील १५ हजार रुपये दिल्याशिवाय आणखी कर्ज देणार नाही, असे राकेश राणा यांनी सांगितले. त्यामुळे चिडून त्याने दुकानाच्या एका काचेवर मोबाइल फेकला आणि त्यानंतर त्वेशाने जाऊ लागला असता ओट्याजवळ खाली पडला. यानंतर प्रेम रेसिडेन्सी येथे रात्रीच्या वेळी राकेश राणा यांची भेट घेतली व त्याच्यासोबत बराच वेळ चर्चा केली. यावेळी काही जण उपस्थित होते. यावेळी वाद होऊन मारहाण झाल्याचे समजते. तर या प्रकरणी अकबरखान यांची पत्नी फरकंदाखान यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलीस स्टेशनमध्ये राकेश राणा, गौरव राणा, राहुल कळमकार व आनंद सेवक सर्व रा. दाळफैल यांच्याविरुद्ध कलम ३२५, ३२४, ३८४, ३४ भादंविसह क महाराष्ट्र सावकारी अधिनियम २0१४ क ३९, ४५ नुसार गुन्हा दाखल केला.  तसेच रात्री राकेश राणा व राहुल कळमकार यांना अटक करण्यात आली असून, इतर आरोपी फरार आहेत. यावेळी मारहाणीत जखमी झाल्याने अकबर खान याला उपचारार्थ अकोला येथे पाठविण्यात आलेले आहे. तर रात्रीच्या वेळेस शहर पोलीस स्टेशन व सामान्य रुग्णालय परिसरात अल्पसंख्याक समाजबांधवांची गर्दी झाली होती.
-

Web Title: Corporator Rakesh Rana and four others

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Crimeगुन्हा