खाऊच्या पैशातुन गतीमंद मुलांच्या शाळेला दिली कुलरची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 01:36 PM2018-03-19T13:36:47+5:302018-03-19T13:36:47+5:30

बुलडाणा : आई वडिलांच्या शिकवणीची जाण ठेऊन सामाजिक दृष्टीकोन बाळगत एका सातवीच्या विद्यार्थ्याने त्याला मिळालेल्या खाऊच्या पैशातुन गतीमंद मुलांच्या शाळेला कुलरची भेट दिली.

cooler given to school instead celebrate birth day | खाऊच्या पैशातुन गतीमंद मुलांच्या शाळेला दिली कुलरची भेट

खाऊच्या पैशातुन गतीमंद मुलांच्या शाळेला दिली कुलरची भेट

googlenewsNext
ठळक मुद्देयेथील जयप्रकाश कस्तुरे व स्वाती कस्तुरे यांचा मुलगा अर्णव भारत विदयालयात सातवी मध्ये शिकतो. . १२ मार्च रोजी  वाढदिवस साजरा न करता खाऊच्या पैशात कुलर घेऊन देण्याचा त्याचा आग्रह पालकांना मोडता आला नाही. हे कुलर भारत गतीमंद विदयालयात गतीमंद मुलांच्या स्वाधीन करण्यात आले.


बुलडाणा : आई वडिलांच्या शिकवणीची जाण ठेऊन सामाजिक दृष्टीकोन बाळगत एका सातवीच्या विद्यार्थ्याने त्याला मिळालेल्या खाऊच्या पैशातुन गतीमंद मुलांच्या शाळेला कुलरची भेट दिली.
येथील जयप्रकाश कस्तुरे व स्वाती कस्तुरे यांचा मुलगा अर्णव भारत विदयालयात सातवी मध्ये शिकतो. १२ मार्च रोजी त्याचा वाढदिवस होता. शाळेतीलच गतीमंद विदयार्थी पाहताना त्याला त्यांच्या जगण्यातली धडपड कळत होती. ही मुले निवासी असून त्यांना सध्या तापत असलेल्या उन्हाळयात गारवा देण्याचा विचार त्याने पालकांना सांगितला.  वाढदिवस साजरा न करता खाऊच्या पैशात कुलर घेऊन देण्याचा त्याचा आग्रह पालकांना मोडता आला नाही. पालकांनी त्याच्या खाऊचे पैसे घेऊन त्याच्या वाढदिवसाकरिता होणारा खर्च ग्राहय धरत कुलर खरेदी केले. हे कुलर भारत गतीमंद विदयालयात गतीमंद मुलांच्या स्वाधीन करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक व कर्मचारी उपस्थित होते. संस्थाध्यक्ष हर्षवर्धन आगाशे, डॉ.स्मिता आगाशे, मुख्याध्यापक उन्हाळे, जाधव आदींची उपस्थिती होती.

Web Title: cooler given to school instead celebrate birth day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.