बुलडाणा शहरात दुषित पाणीपुरवठा; नागरिकांचे आरोग्य धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2019 03:27 PM2019-06-04T15:27:19+5:302019-06-04T15:30:32+5:30

बुलडाणा : सर्वत्र पाणीटंचाई जाणवत असतांना बुलडाणा शहरात मात्र पिवळसर असे दुषित पाणीपुरवठा होत आहे.

contaminated water supply in Buldana city; Civil health risks | बुलडाणा शहरात दुषित पाणीपुरवठा; नागरिकांचे आरोग्य धोक्यात

बुलडाणा शहरात दुषित पाणीपुरवठा; नागरिकांचे आरोग्य धोक्यात

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : सर्वत्र पाणीटंचाई जाणवत असतांना बुलडाणा शहरात मात्र पिवळसर असे दुषित पाणीपुरवठा होत आहे. पालिकेच्या नळयोजनेद्वारे सोडल्या जाणाऱ्या पाण्याचा रंग बदलल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहेत. जोहर नगरमध्ये पाण्यात नारु आढळल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
जिल्ह्यात सर्वत्र तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. बुलडाणा शहराला येळगाव धरणावरुन पाणीपुरवठा करण्यात येतो. मात्र पालिकेच्या नळयोजनेद्वारे सोडल्या जाणाºया पाण्याचा रंग बदलल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. काही दिवसांपासून शहरात पिवळसर पाणीपुरवठा होत आहे. याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष झाले आहे. येळगाव धरणात सध्या मृतसाठा शिल्लक आहे. त्याद्वारे बुलडाणा शहर व आजूबाजूच्या १५ गावांना पाणीपुरवठा होत आहे. दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढत असल्याने बाष्पीभवनाचे प्रमाण वाढले आहे. उपलब्ध जलसाठा झपाट्याने कमी होत आहे. त्यामुळे पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे. शहरातील जोहर नगरमध्ये पाण्यात नारु आढळल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पालिका प्रशासनाने याबाबत तत्काळ उपाययोजना करण्याची मागणी करण्यात येत आहे.
काँग्रेसच्या वतीने ३ जून रोजी पालिकेच्या कारभाराबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. नगर परिषद बरखास्त करण्याची मागणी केली. दोन वर्षांपासून शहरातील स्वच्छता कमालीची ढासळली आहे. त्यामुळे शहरात डेंग्यूचे रुग्ण वाढले होते. नालेसफाईकडे पुर्णपणे दुर्लक्ष झाले. रमजान ईद सण जवळ आला असतांना शहरात साफसफाई व दिवाबत्तीची सोय नसल्याचा आरोप काँग्रेसच्या वतीने करण्यात आला आहे. गेल्या दोन महिन्यांपासून शहरवासियांना दुषित पाणीपुरवठा होत आहे. पाणी शुध्द करण्यासाठी दुय्यम दर्जाच्या बाबींचा वापर होत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. शहरात यापुर्वीही पाणीटंचाई निर्माण झाली होती. मात्र अशुध्द पाणीपुरवठा झाला नव्हता असे सांगत गेल्या काही दिवसांपासून शहराला दुषित पाणीपुरवठा होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. नगरपालिका बरखास्त करावी किंवा प्रशासक नेमण्यात यावा, अशी मागणी जिल्हाधिकाºयांकडे करण्यात आली. यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष दत्ता काकस, सुनील सपकाळ, जाकीर कुरेशी, आमीन टेलर, सुरेश सरकटे, योगेश परसे, चंद्रकांत चव्हाण, विलास खरे, अ‍ॅड. राज शेख, मो. अझहर, युसूफ खान, जुबेर खान, रियाज ठेकेदार हजर होते.

Web Title: contaminated water supply in Buldana city; Civil health risks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.