‘तो’ ठराव बेकायदेशीर असल्याचा काँग्रेसचा दावा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2018 01:34 AM2018-03-22T01:34:15+5:302018-03-22T01:34:15+5:30

खामगांव :   नगरपालिकेच्या सभेत वारंवार गैरवर्तन केल्याप्रकरणी काँग्रेसच्या १२ नगरसेवकांना अपात्र ठरविण्यासाठी बुधवारी पालिकेची खास सभा बोलाविण्यात आली.  या सभेत सत्ताधा-यांनी बहुमताच्या जोरावर काँग्रेसच्या १२ नगरसेवकांना अपात्र ठरविण्यासाठी ठराव पारित केले. सत्ताधा-यांनी बुधवारी पारित केलेला ठराव बेकायदेशीर असून, न्यायालयात टिकणार नाही, असा दावा काँग्रेस गटनेत्या अर्चना टाले यांनी केला आहे.

Congress claims claim that it is illegal! | ‘तो’ ठराव बेकायदेशीर असल्याचा काँग्रेसचा दावा!

‘तो’ ठराव बेकायदेशीर असल्याचा काँग्रेसचा दावा!

googlenewsNext
ठळक मुद्देनगरसेवक गैरवर्तणूक प्रकरणभाजपवाल्यांनी केलेली शिफारस न्यायालयात टिकणार नाही

लोकमत न्यूज नेटवर्क
खामगांव :   नगरपालिकेच्या सभेत वारंवार गैरवर्तन केल्याप्रकरणी काँग्रेसच्या १२ नगरसेवकांना अपात्र ठरविण्यासाठी बुधवारी पालिकेची खास सभा बोलाविण्यात आली.  या सभेत सत्ताधा-यांनी बहुमताच्या जोरावर काँग्रेसच्या १२ नगरसेवकांना अपात्र ठरविण्यासाठी ठराव पारित केले. सत्ताधा-यांनी बुधवारी पारित केलेला ठराव बेकायदेशीर असून, न्यायालयात टिकणार नाही, असा दावा काँग्रेस गटनेत्या अर्चना टाले यांनी केला आहे.
यासंदर्भात काँग्रेस गटनेत्या अर्चना टाले, नगरसेवक तथा काँग्रेस शहर अध्यक्ष प्रवीण कदम, नगरसेवक अमेय सानंदा यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद केले, की या सभेत काँग्रेस नगरसेवकांनी दिलेल्या उपसूचनेत सर्व कायदेशीर मुद्दे मांडण्यात आले आहे. या सभेत  उपसूचनेद्वारे काँग्रेस नगरसेवकांनी  अध्यक्ष व भाजपाच्या नगरसेवकांना कायदा दाखवून त्यांच्या कर्तव्याची जाण करून दिल्यानंतरदेखील असंविधानिक पद्धतीने, बेकायदेशीररीत्या व राजकीय द्वेषाने प्रेरित होऊन नगराध्यक्ष अनिता डवरे व भाजपा नगरसेवकांनी बहुमताच्या जोरावर अधिकाराचा दुरुपयोग करून बेकायदेशीर ठराव मंजूर करून गैरवर्तन केले आहे व काँग्रेसच्या १२ नगरसेवकांविरुद्ध कलम ९२  अन्वये गैरवर्तन केल्याबद्दल त्यांना पदावरून दूर करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याचा ठराव घेतला आहे. 
१५  जानेवारी २०१८ रोजीच्या महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक-४ मधील पोटकलम ८१ च्या खंड ‘ब’मध्ये नगराध्यक्षांनी घेतलेल्या विषयावर मुख्याधिकारी यांचा तपशीलवार अभिप्राय असणे आवश्यक आहे; पण उक्त विषयावर महाराष्ट्र नगर परिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ अन्वये गैरवर्तन या सज्ञेंतर्गत कोणत्या कृतीचा समावेश होतो, असा स्पष्ट उल्लेख नाही. 
त्यामुळे अध्यक्षांच्या निर्णयाविषयी स्पष्ट अभिप्राय देता येणार नाही, अशी टिप्पणी उक्त विषयावर मुख्याधिकारी यांनी दिल्यामुळे सत्ताधारी भाजपवाल्यांचे  हसे झाल्याचाही दावा काँग्रेस नगरसेवकांनी केला आहे. याबाबत आपण न्यायालयात दाद मागणार असल्याचे नगरपालिकेतील काँग्रेसच्या पक्षनेत्या अर्चना टाले यांनी सांगितले. 
यावेळी  प्रवीण कदम, देवेंद्र देशमुख, अलकादेवी सानंदा, सरस्वती खासने, भूषण शिंदे, इब्राहिमखा सुभानखा,  शेख फारुख बिसमिल्ला, अब्दुल रशीद अब्दुल लतीफ, नगरसेविका शीतल माळवंदे, संगीता पाटील, नगरसेविका शेख रेहानाबानो शेख मेहबुब हे प्रामुख्याने उपस्थित होते.
 

Web Title: Congress claims claim that it is illegal!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.