पत्रकारांच्या अधिवेशनाचा समारोप 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2017 12:16 AM2017-08-21T00:16:17+5:302017-08-21T00:16:48+5:30

शेगाव : संतनगरी शेगावमध्ये मराठी पत्रकार परिषदेचे पार पडलेले   ४१ वे राष्ट्रीय अधिवेशन हे पत्रकारितेसाठी प्रेरणादायी ठरणार  असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री ना.डॉ. रणजित  पाटील यांनी केले.  शेगाव येथे दोन दिवसांपासून सुरू असलेल्या  मराठी पत्रकार परिषदेच्या ४१ व्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या समारो पीय कार्यक्रमात ते  बोलत होते. 

The conclusion of the convention of journalists | पत्रकारांच्या अधिवेशनाचा समारोप 

पत्रकारांच्या अधिवेशनाचा समारोप 

Next
ठळक मुद्देसंतनगरीतील अधिवेशन पत्रकारितेसाठी प्रेरणादायी गृहराज्यमंत्री पाटील यांचे प्रतिपादन 

लोकमत न्यूज नेटवर्क
शेगाव : संतनगरी शेगावमध्ये मराठी पत्रकार परिषदेचे पार पडलेले   ४१ वे राष्ट्रीय अधिवेशन हे पत्रकारितेसाठी प्रेरणादायी ठरणार  असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री ना.डॉ. रणजित  पाटील यांनी केले.  शेगाव येथे दोन दिवसांपासून सुरू असलेल्या  मराठी पत्रकार परिषदेच्या ४१ व्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या समारो पीय कार्यक्रमात ते  बोलत होते. 
 दोन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशनाचा रविवार, २0 ऑगस्ट रोजी   श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयामधील  सुसज्ज सभागृहामध्ये  समारोप करण्यात आला. परिषदेचे  राज्याध्यक्ष एस. एम. देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या  या कार्यक्रमास  प्रमुख अतिथी म्हणून गृहराज्यमंत्री ना. डॉ. रणजित  पाटील, बुलडाणाचे आ.हर्षवर्धन सपकाळ, मराठी पत्रकार  परिषदेचे कार्याध्यक्ष सिद्धार्थ शर्मा, विश्‍वस्त किरण नाईक,  सरचिटणीस यशवंत पवार, मिलिंद आष्टीवकर, माजी अध्यक्ष  माधवराव अंभोरे, अनिल महाजन, विजय जोशी, अकोला येथील  शोएब अली मीर साहेब,  अधिवेशनाचे मुख्य संयोजक अमरावती  विभागीय सचिव तथा बुलडाणा जिल्हाध्यक्ष राजेंद्र काळे, ज्येष्ठ  पत्रकार समाधान सावळे, डॉ. जयंतराव खेळकर यांच्यासह इतर  पदाधिकारी व मान्यवरांची व्यासपीठावर उपस्थिती होती.
प्रास्ताविकामध्ये मुख्य संयोजक जिल्हाध्यक्ष राजेंद्र काळे यांनी या  अधिवेशनासाठी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहकार्य करणार्‍या सर्वांचे  आभार व्यक्त करून संतनगरीत हे अधिवेशन घेण्याचा बुलडाणा  जिल्हा पत्रकार संघाचा मानस या माध्यमातून फलश्रुत झाल्याचे  त्यांनी सांगितले. यावेळी यशवंत पवार यांनी दोन वर्षांतील  कामकाजाचा आढावा सादर केला. आ.हर्षवर्धन सपकाळ यांनी  पत्रकारांच्या या अधिवेशनाचे कौतुक करीत पत्रकारांचे प्रश्न  सोडविण्यासाठी आपण पाठपुरावा करू असे सांगितले. तत्पूर्वी  खा. प्रतापराव जाधव, आ. बच्चू कडू यांनी उपस्थित राहून  पत्रकारांच्या समस्या शासन दरबारी मांडून त्या सोडवून घेण्यासाठी  प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. 
आतापर्यंत झालेल्या सर्व अधिवेशनापेक्षा शेगावचे हे अधिवेशन  भव्य दिव्यच नव्हे, तर उत्कृष्ट नियोजन व शिस्तबद्धही होते. या  अधिवेशनाच्या माध्यमातून श्री संत गजानन महाराज संस्थांनच्या  सेवाभावाची ओळखही तमाम पत्रकारांना झाल्याचे    प्रतिपादन  मराठी पत्रकार परिषदचे राज्याध्यक्ष एस. एम. देशमुख यांनी केले.  समारोप कार्यक्रमात हे अधिवेशन यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल  मराठी पत्रकार परिषदेकडून मान्यवरांच्या हस्ते आयोजक   बुलडाणा जिल्हय़ातील  सर्व पत्रकार बांधवांचा तसेच राज्य स् तरावरील काही पदाधिकारी यांचा उत्कृष्ट नियोजन केल्याबद्दल तर   बहारदार संचलन केल्याबद्दल पत्रकार गजानन धांडे, सिद्धेश्‍वर  पवार आणि पत्रकार कल्याण निधीसाठी एक लाख रुपये  दिल्याबद्दल जिल्हा कार्याध्यक्ष सुधीर चेके यांचा शिल्ड व पुष् पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. भावी अध्यक्ष तथा राज्याचे  कार्याध्यक्ष सिद्धार्थ शर्मा व राज्याध्यक्ष एस. एम. देशमुख यांनी  पत्रकार परिषदेच्या कार्याबाबत माहिती सांगितली.                  

पुढील अधिवेशन शिर्डीत
मराठी पत्रकार परिषदेचे पुढील अधिवेशन शिर्डी येथे घेण्यात यावे,  असे आवाहन अधिवेशनामध्ये शनिवारी उद्घाटक सुरेश हावरे  यांनी केले होते. त्यांच्या या आवाहनाला मराठी पत्रकार  परिषदेकडून सकारात्मक प्रतिसाद देण्यात आला. त्यामुळे पुढील  अधिवेशन शिर्डीत होण्याची शक्यता आहे.

Web Title: The conclusion of the convention of journalists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.