चिमुकलीवर चाकू रोखून दरोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2017 01:24 AM2017-11-15T01:24:11+5:302017-11-15T01:25:10+5:30

दीड वर्षाच्या चिमुकलीवर चाकू रोखून एमआयडीसीमधील एका  घरावर चड्डी-बनियान टोळीने दरोडा टाकून घरातील पावणे दोन लाखाचा ऐवज  सोमवारी लुटला. 

Chuckle a knife and crack the robbery | चिमुकलीवर चाकू रोखून दरोडा

चिमुकलीवर चाकू रोखून दरोडा

Next
ठळक मुद्देएमआयडीसीमधील घटना पावणे दोन लाखाची केली लूट!

लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : दीड वर्षाच्या चिमुकलीवर चाकू रोखून एमआयडीसीमधील एका  घरावर चड्डी-बनियान टोळीने दरोडा टाकून घरातील पावणे दोन लाखाचा ऐवज  सोमवारी लुटला. 
सुटाळा बु. एमआयडीसी परिसरातील गौरा नगर येथील विजय भीमराव गवई (वय  ३0) यांच्या घरी सोमवारी मध्यरात्री दरम्यान तीन दरोडेखोरांचा समावेश  असलेल्या चड्डी -बनियानधारी टोळीने घराच्या मुख्य दरवाजांचा कडी-कोंडा  तोडून आत प्रवेश केला. यावेळी घरामध्ये आई-वडिलांसोबत झोपेत असलेल्या  दीड वर्षाची चिमुकली माही हिला दरोडेखोरांनी उचलून तिच्यावर चाकू रोखला व  विजय गवई आणि त्यांच्या पत्नीकडे अलमारीच्या चावीची मागणी केली. 
मुलीचा जीव संकटात असल्याचे पाहून विजय गवई यांनी दरोडेखोरांना  अलमारीच्या लॉकरची चावी दिली. दरोडेखोरांनी अलमारीतील रोख आणि  सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह १ लाख ७५ हजार २00 रुपयांचा ऐवज लुटला. सोब तच विजय आणि त्यांची पत्नी मनिषा गवई यांना रूममध्ये कोंडून पळ काढला.  यावेळी विजय गवई यांनी मागच्या दरवाजाने कशी-बशी स्वत:ची सुटका करून  घेऊन थेट शिवाजीनगर पोलीस स्टेशन गाठून घडलेल्या घटनेची माहिती पोलिसांना  दिली. यावेळी पोलिसांनी तीन अज्ञात दरोडेखोरांविरुद्ध कलम ३९२, ४४८, ३४  भादंविनुसार गुन्हा दाखल केला. दरोड्याची माहिती मिळताच पोलीस प्रशासन  खळबळून जागे झाले. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी दाखल होऊन डॉग स्कॉडला  पाचारण केले. यावेळी एएसपी घुगे, डीवायएसपी पाटील यांनी घटनास्थळी  पोहोचून दरोड्याची माहिती घेतली. सोमवारी मध्यरात्रीदरम्यान चड्डी-बनियान  टोळीने खराटे ले-आउट भागात दरोड्याचा प्रयत्न केल्याची माहिती आहे, तसेच या  अगोदरही शहरातील मीरा नगर, घाटपुरी नाका या भागातही चड्डी-बनियान टोळीने  चोरीचा प्रयत्न केला होता. ही टोळी शहरात सक्रिय असल्याचे समजते.
शहरात खळबळ 
या घटनेमुळे नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली असून, दरोड्याची माहिती मिळ ताच एएसपी, डीवायएसपीसह पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला.  दरोडेखोरांचा तपास लावण्यासाठी पोलिसांनी डॉग स्कॉडला पाचारण केले आहे. 

Web Title: Chuckle a knife and crack the robbery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Crimeगुन्हा