दोन चिमुकल्यांसह चिंचोले कुटुंबियांचे उपोषण 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2019 06:07 PM2019-02-25T18:07:41+5:302019-02-25T18:08:09+5:30

अनिल साहेबराव चिंचोले यांनी २५ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आपल्या कुटुंबासह उपोषण सुरु केले आहे.

Chinchole family fast with two children | दोन चिमुकल्यांसह चिंचोले कुटुंबियांचे उपोषण 

दोन चिमुकल्यांसह चिंचोले कुटुंबियांचे उपोषण 

Next


बुलडाणा: किन्होळा येथील सरपंच व सचिव हे मनमानी पद्धतीने कामकाज करीत असून विविध योजनांमध्ये अपहार केला जात आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करावी, या मागणीसाठी अनिल साहेबराव चिंचोले यांनी २५ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आपल्या कुटुंबासह उपोषण सुरु केले आहे.
किन्होळा येथील सरपंच बाहेकर, ग्रामविकास अधिकारी रामेश्वर मुंडे, उपसरपंच शेख अशफाक, गटविकास अधिकारी भुजबळ, मंडळ अधिकारी गायकवाड, तलाठी सुनील टेकाळे, नायब तहसीलदार कानडजे यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचाºयांनी ३० नोव्हेबर २०१८ रोजी दुपारी अतिक्रमण हटविण्याच्या नावाखाली चिंचोले यांच्या राहत्या घराचे नुकसान केले. कोणतीची पूर्व सूचना न देता राजकीय द्वेषापोटी राहते घर तोडून पत्नी व दोन मुलांना रस्त्यावर आणले. विशेष म्हणजे संपूर्ण गावात केवळ एकाच ठिकाणी अतिक्रमण काढण्याची ही कारवाई करण्यात आली.  निवासी जागेवरील अतिक्रमण हटवून त्यानंतर शेतीसाठी ही जागा दुसºयाच्या ताब्यात देऊन त्यावर अतिक्रमण करण्यात आले. ग्रामपंचायत प्रशासनाने केलेल्या या अन्यायाबाबत कारवाई करुन नुकसान भरपाई द्यावी तसेच निवाºयासाठी जागा द्यावी, २०१७ मध्ये पाणी नसलेली विहिरी अधिग्रहीत केल्याचे दाखवून शासनाची दिशाभूल करुन पैसे काढण्यात आले, याबाबत देखील चौकशी करावी व गावातील रहदारीस अडथळा निर्माण करणारे सर्व अतिक्रमण हटविण्यात यावे, या मागणीसाठी २३ फेब्रुवारी रोजी अनिल साहेबराव चिंचोले यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सहकुटुंब उपोषण सुरु केले.

Web Title: Chinchole family fast with two children

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.