चिखली शहर पाणी पुरवठय़ाच्या जलवाहिनीतून पाण्याची चोरी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2018 12:49 AM2018-02-09T00:49:58+5:302018-02-09T00:51:43+5:30

चिखली : शहराला १२ ते १४ दिवसाआड पाणी पुरवठा होत असताना चिखली ते मेहकर राष्ट्रीय महामार्गाचे बांधकाम करणार्‍या ठेकेदाराने शहर पाणी पुरवठय़ाच्या चिखली ते पेनटाकळी मार्गावरील मुख्य जलवाहिनीवरून दिवसा-ढवळय़ा पाण्याची चोरी करण्याचा महाप्रताप केला. शहराला पुरवठा होणार्‍या जलवाहिनीला जाणून बुजून लिक करून त्या पाण्याचा उपयोग रस्त्याच्या कामासाठी होत असल्याचे निदर्शनास आल्याने न.प.पाणी पुरवठा अभियंता मनोज मधुकर शेळके यांनी चिखली पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे.

Chikhli city water supply water from the water theft! | चिखली शहर पाणी पुरवठय़ाच्या जलवाहिनीतून पाण्याची चोरी!

चिखली शहर पाणी पुरवठय़ाच्या जलवाहिनीतून पाण्याची चोरी!

googlenewsNext
ठळक मुद्देमहामार्गाचे काम करणार्‍या ठेकेदाराचा प्रताप

लोकमत न्यूज नेटवर्क
चिखली : शहराला १२ ते १४ दिवसाआड पाणी पुरवठा होत असताना चिखली ते मेहकर राष्ट्रीय महामार्गाचे बांधकाम करणार्‍या ठेकेदाराने शहर पाणी पुरवठय़ाच्या चिखली ते पेनटाकळी मार्गावरील मुख्य जलवाहिनीवरून दिवसा-ढवळय़ा पाण्याची चोरी करण्याचा महाप्रताप केला. शहराला पुरवठा होणार्‍या जलवाहिनीला जाणून बुजून लिक करून त्या पाण्याचा उपयोग रस्त्याच्या कामासाठी होत असल्याचे निदर्शनास आल्याने न.प.पाणी पुरवठा अभियंता मनोज मधुकर शेळके यांनी चिखली पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे.
सद्यस्थितीत चिखली ते मेहकर या महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम वेगात आहे. हा रस्ता काँक्रीटीकरणाचा असल्याने यासाठी पाण्याची मोठय़ा प्रमाणावर गरज भासत असल्याने या महामार्गाचे काम करणार्‍या ठेकेदाराने चक्क चिखली शहरास पेनटाकळी प्रकल्पावरून होणार्‍या पाणी पुरवठय़ाची मुख्य जलवाहिनी लिक करून पाण्याची चोरी चालविली होती. 
 चिखली मेहकर रस्त्यावर असलेल्या मुंगसरी शिवारातील महामार्गाशेजारी ठेकेदाराने पाणीपुरवठय़ाच्या जलवाहिनीवरील एका व्हॉल्वजवळील शेतात चर खोदून पाइपलाइनवरून लिक केलेले पाणी शेतातील विहिरीसदृश खड्डय़ामध्ये जमा केले व तेथून आपल्या ताब्यातील ट्रॅक्टर क्र.एम.एच.१५ ईएस ७८३१ ला लावलेल्या पंपाद्वारे पाण्याचा उपसा चालविला होता. हे पाणी दोन मोठय़ा टँकर ( क्रमांक  एम.एच.२१-६६७१ व  एम.एच.२१ एक्स ५१९) च्या सहाय्याने  रस्ता बांधकामासाठी वापरण्यात येत होते. विशेष म्हणजे चिखली मेहकर रस्त्याचे बांधकाम करणारे कंत्नाटदार जे.एम.म्हात्ने रा.सहकार नगर, पनवेल जि.रायगड यांनी गत २४ जानेवारी २0१८ रोजी चिखली मुख्याधिकार्‍यांना या महामार्गाच्या बांधकामासाठी दररोज सत्तर हजार लिटर पाणी देण्याबाबत अर्ज केला होता; मात्न शहरास पाण्याची कमतरता असल्यामुळे तो अर्ज नामंजूर करण्यात आला होता. दिवसा-ढवळय़ा हा गैरप्रकार सुरू होता. शहराला पाणी पुरवठा होणार्‍या ४५0 एमएम व्यासाच्या पाइपलाइनला कंत्नाटदाराने आपल्याजवळील ट्रॅक्टर व  टँकरच्या सहाय्याने मजुरांच्या मदतीने १ फेब्रुवारी पासून लिकेज करून सुमारे ३४ लाख ४0 हजार लिटर पाणी ज्याची अंदाजे किमत ६१४00 रुपये आहे. 
ते चोरून नेले अशा आशयाची तक्रार न.प.अभियंता शेळके यांनी ८ फेब्रुवारी रोजी चिखली पोलिसांत दाखल करून कंत्नाटदारावर भारतीय दंड संहिता कलम ३७९, ३४ व नगर परिषदा, नगर पंचायती  व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ चे कलम २१६ नुसार गुन्हा नोंद होऊन कारवाईची मागणी केली आहे. या तक्रारीवरून चिखलीे पोलिसांनी कारवाई करीत उपरोक्त दोन्ही पाण्याचे टँकर ताब्यात घेतले असून, वृत्त लिहेपर्यंत याप्रकरणी गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.

Web Title: Chikhli city water supply water from the water theft!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.