चिखली : मागण्यांसाठी एसटी कर्मचारी आक्रमक : वेतनवाढ अहवालाची होळी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 26, 2018 02:01 AM2018-01-26T02:01:54+5:302018-01-26T02:02:19+5:30

चिखली: एसटी कर्मचार्‍यांच्या वेतनवाढीसंदर्भात उच्चस्तरीय समितीने दिलेला अहवाल एसटी कर्मचार्‍यांच्या आयोग कृती समितीने फेटाळला असून, या अहवालाचा निषेध म्हणून महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस (इंटक) संघटनेच्यावतीने चिखली आगारात २५ जानेवारी रोजी या अहवालाची होळी करण्यात आली.

Chikhali: ST employees aggressive for the demands: Holi of salary increase report! | चिखली : मागण्यांसाठी एसटी कर्मचारी आक्रमक : वेतनवाढ अहवालाची होळी!

चिखली : मागण्यांसाठी एसटी कर्मचारी आक्रमक : वेतनवाढ अहवालाची होळी!

googlenewsNext
ठळक मुद्देमेहकर : होळी करून आक्रोश मोर्चा व संपाचा इशारा!

लोकमत न्यूज नेटवर्क
चिखली: एसटी कर्मचार्‍यांच्या वेतनवाढीसंदर्भात उच्चस्तरीय समितीने दिलेला अहवाल एसटी कर्मचार्‍यांच्या आयोग कृती समितीने फेटाळला असून, या अहवालाचा निषेध म्हणून महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस (इंटक) संघटनेच्यावतीने चिखली आगारात २५ जानेवारी रोजी या अहवालाची होळी करण्यात आली.
एसटी कर्मचार्‍यांनी संप पुकारल्यानंतर उच्च न्यायालयाने यासंदर्भात उच्चस्तरीय समिती नेमून अहवाल सादर करण्याचे आदेश राज्य शासनाला दिले होते. त्यानुसार अहवाल जारी करण्यात आला आहे; मात्र हा अहवाल तयार करताना संपकरी कर्मचार्‍यांच्या संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा करण्याचे सौजन्यही शासनाच्या प्रधान सचिवांनी दाखविले नाही, उच्च न्यायालयाने वेतनवाढीचा अहवाल देण्याबाबत सांगितले असताना समितीने त्याऐवजी स्वत:च्या अखत्यारीत असलेल्या महामंडळाच्या आर्थिक परिस्थितीचे विवरण केले, इतर राज्यातील परिवहन मंडळे तोट्यात असताना त्यांनी कर्मचार्‍यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याची प्रक्रिया सुरू केली असताना महाराष्ट्रात या बाबीला बगल दिल्या जात आहे. उलटपक्षी समितीने सर्व भत्ते वाढविण्याऐवजी कमी करण्याची शिफारस केली, वर्षिक वेतनवाढ ३ टक्केऐवजी २ टक्के, घरभाडे १0 ऐवजी ७ टक्के याप्रमाणे सर्व भत्यांमध्ये घट केली, वेतनवाढीची अंमलबजावणी १ एप्रिल २0१६ ऐवजी १ जानेवारी २0१८ पासून पुढे ४ वर्षांची केली आहे, आदी आरोप इंटक संघटनेने केले असून, हा अहवाल कामगारांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करून व कामगारांना तुच्छ समजून जाणीवपूर्वक वस्तुस्थितीपासून दूर जाऊन तयार केला असल्याचे स्पष्ट करीत हा अहवाल महाराष्ट्र इंटक व आयोग कृती समितीमधील कुठल्याही संघटनेला मान्य नसल्याचे संघटनेने जाहीर केले असून, याचा निषेध करण्यासाठी चिखली आगारात एसटी कर्मचार्‍यांनी होळी केली. यावेळी इंटकचे अमरावती प्रदेश सचिव अनंत सानप,  डेपो अध्यक्ष महेंद्र सदावर्ते, सचिव अविनाश वेंडोले, आनंद अवसरमोल, गणेश इंगळे, भारत सुरडकर,  सुनील पाटील, एलवांडे, जीवन जाधव आदींसह कर्मचारी उपस्थित होते. 

मेहकर : होळी करून आक्रोश मोर्चा व संपाचा इशारा!
एसटी महामंडळाच्या कर्मचार्‍यांनी आपल्या विविध मागण्यासांठी दिवाळी सणाच्या दरम्यान संप पुकारला होता. सदर मागण्या सोडविण्यासाठी न्यायालयाने एका उच्चस्तरीय समितीची नियुक्ती केली होती. त्या उच्चस्तरीय समितीने दिलेल्या अहवालानुसार कर्मचार्‍यांचे समाधान न झाल्याने त्या अहवालाच्या विरोधात मेहकर आगाराच्या कर्मचार्‍यांनी २५ जानेवारी रोजी अहवालाचीच होळी केली. एसटी महामंडळाच्या कर्मचार्‍यांनी वेतनवाढ व इतर मागण्यांसंदर्भात दिवाळी सणाच्या दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संप पुकारला होता. या संपामुळे त्यावेळी सर्वसामान्यांची चांगलीच धांदल उडाली होती. या कर्मचार्‍यांना शासनाकडून पाहिजे त्या प्रमाणात मोबदला मिळत नसल्याने नाराजीचा सूर आहे. सदर मागण्या पूर्ण करण्यासाठी कामगार संघटनेच्या कार्यकारिणीने शासनाक डे लोकशाही मार्गाने पाठपुरावा केला होता; मात्र तरीही शासनाने सदर मागण्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे कर्मचार्‍यांनी संप पुकारला होता. शासन व कर्मचारी यांच्यामध्ये न्यायालयाने एक उच्चस्तरीय समिती नेमून कर्मचार्‍यांच्या मागणीचा अहवाल सादर करण्याच्या सूचना उच्चस्तरीय समितीला केल्या होत्या. त्यामुळे उच्चस्तरीय समितीने आपला अहवाल तयार केला असून सदर अहवालानुसार कर्मचार्‍यांचे समाधान झाले नसल्याने मेहकर आगारातील कर्मचार्‍यांनी होळी आंदोलन केले. यावेळी कामगार संघाचे महाराष्ट्र उपाध्यक्ष किसनराव बळी, इंटक चे विभागीय कार्याध्यक्ष सतीश तेजनकर, डेपो अध्यक्ष डी.एस.मगर, सुनील राठोड, सचिव शेख अबरार, एस.बी. पाटील, एस.पी. जाधव, नागेश कांगणे, अशोक चांदणे, पी.ए. आघाव, यू.आर.देशमुख, डी.एल.निकम, टी.एस. तेजनकर, डी.यू. सराटे, व्ही.ए.चेके, पंढरी आघाव, यशवंत खरात, एस.के. सोनुने, सोनु जाट, आत्माराम कायंदे, अनिल पाटील, पाचपोर, अंगद चव्हाण, राम सवडतकर, एन.एल. साबळे, शंकर नागरिक आदी कर्मचार्‍यांनी या आंदोलनात सहभाग घेतला होता. कर्मचार्‍यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी मागील वर्षात संप पुकारला होता. या संपानुसार उच्चस्तरीय समितीने दिलेल्या अहवालामध्ये कर्मचार्‍यांचे समाधान न झाल्याने १९ फेब्रुवारी रोजी मुंबई येथे सहकुटुंब विराट आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे व त्यानंतरही मागण्या मंजूर न झाल्यास पुन्हा संप पुकारण्याचा इशारा यावेळी कर्मचार्‍यांनी दिला.

Web Title: Chikhali: ST employees aggressive for the demands: Holi of salary increase report!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.