Before the Chief Minister's meeting, there were two groups of disputes, black flag shown | मुख्यमंत्र्यांच्या सभेआधी दोन गटांमध्ये वाद, दाखवले काळे झेंडे

बुलडाणा : नांदुरा येथे होणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेआधी दोन गटांमध्ये वाद झाला. यावेळी सभेसाठी लावण्यात आलेल्या खुर्च्यांची फेकाफेकीही करण्यात आली. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यानं मोठा गोंधळ टळला आहे. काही तरुणांनी सभेमध्ये काळे झेंडे दाखवत विदर्भ राज्यासाठी मागणी केली. 

आज दुपारी बुलडाणा जिल्ह्यातील नांदुऱ्यात मुख्यमंत्र्यांची सभा होणार होती. मात्र सभा सुरु होण्यापूर्वी दोन गटांमध्ये काही कारणाने वाद झाला. याच वादात उपस्थित नागरिकांनी खुर्च्या उचलून एकमेकांवर फेकण्यास सुरुवात केली. मात्र पोलिसांनी प्रसंगावधान राखत हस्तक्षेप केला आणि तणाव काहीसा निवळला.

मुख्यमंत्र्यांना विरोध करण्याच्या प्रयत्नात असलेल्या काँग्रेस आणि मनसेच्या कार्यकर्त्यांना अटक
नांदुरा येथील सभेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आगमन होण्यापूर्वीच रविवारी 17 डिसेंबर रोजी पोलिसानी त्यांना अटक केली. जिगाव प्रकल्पासह 8 लघु प्रकल्पाच्या कामाचे कार्यान्वितीकरण आज होत आहे. सरकारच्या चुकीच्या धोरणाबाबत जनतेत रोष होता. नेत्यांना काळे झेंडे दाखविण्यापूर्वीच सभेच्या आधी काँग्रेसच्या व मनसेच्या कार्यकर्त्यांना अटक केली. यामध्ये कॉंग्रेस तालुकाध्यक्ष भगवान् धांडे,  मोहतेशाम रजा शहर अध्यक्ष,  नीलेश पाउलझगडे,  राजेश पोलाखरे कॉंग्रेस, श्रीकृष्ण सपकाळ मनसे, गणेश धामोड़कर मनसे, निलेश डवले नगर विकास आघाडी यांच्यासह 50 ते 60 कार्यकर्त्याचा समावेश होता. खामगाव शहर पो.स्टे.येथे नेण्यात आले. 


Web Title: Before the Chief Minister's meeting, there were two groups of disputes, black flag shown
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.