पुणे महापौर चषक शुटिंग बॉल स्पर्धेत बुलडाणा विजयी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2018 09:58 PM2018-02-14T21:58:39+5:302018-02-14T22:00:33+5:30

अकोला : पुणे येथे आयोजित महापौर चषक राज्यस्तरीय शुटिंगबॉल स्पर्धा-२0१८ मध्ये बुलडाणा जिल्हय़ाचे प्रतिनिधित्व करीत शिवनेरी संघ अमडापूरने अंतिम सामन्यात जय जिजाऊ पुणे संघाला पराभूत करू न विजेतेपद पटकाविले.

Buldhana wins Pune Mayor trophy shootout ball! | पुणे महापौर चषक शुटिंग बॉल स्पर्धेत बुलडाणा विजयी!

पुणे महापौर चषक शुटिंग बॉल स्पर्धेत बुलडाणा विजयी!

Next
ठळक मुद्देअमडापूरच्या शवनेरी संघाने अंतिम सामन्यात पुण्याच्या जय जिजाऊ संघाला पराभूत करू न विजेतेपद पटकाविले

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : पुणे येथे आयोजित महापौर चषक राज्यस्तरीय शुटिंगबॉल स्पर्धा-२0१८ मध्ये बुलडाणा जिल्हय़ाचे प्रतिनिधित्व करीत शिवनेरी संघ अमडापूरने अंतिम सामन्यात जय जिजाऊ पुणे संघाला पराभूत करू न विजेतेपद पटकाविले.
साखळी सामन्यात नांदेड, यवतमाळ, हिंगोली संघांना पराभूत करू न अमडापूर (बुलडाणा) संघाने बाद फेरीत प्रवेश केला. बादफेरीत स्वराज्य संघ पुणे यांना हरवून उपान्त्य सामन्यात प्रवेश केला. यामध्ये वर्धा व बुलडाणा यांच्यात चुरशीची लढत होऊन बुलडाणा संघाने दणदणीत विजय मिळविला. अंतिम सामन्यात शानदार प्रदर्शन करीत अमडापूर संघाने महापौर चषक पुणे-२0१८ वर आपले नाव कोरले.
विजयी संघात कर्णधार कल्पना फंदाट, पल्लवी राऊत, ज्योती सपकाळ, कल्याणी माळोदे, शारदा शिंदे, तन्वी खाजभागे, गायत्री पांडे यांचा समावेश आहे. विजयी संघाला रोख ५0 हजार व चषक देऊन गौरविण्यात आले. कल्पना फंदाट हिला बेस्ट शुटर व ज्योती सपकाळ हिला बेस्ट प्लेअर ऑफ द टुर्नामेंटचा पुरस्कार देण्यात आला. दोघींनाही वैयक्तिक पाच हजार रुपये रोख देऊन सन्मानित करण्यात आले. संघाला प्रशिक्षक शरद खाजभागे व संघ व्यवस्थापक विजय इंगळे यांचे मार्गदर्शन लाभले.

Web Title: Buldhana wins Pune Mayor trophy shootout ball!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.