बुलडाणा लोकसभा निवडणूक निकाल 2019:  प्रतापराव जाधवांची विजयाची हॅट्रीक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2019 02:23 PM2019-05-24T14:23:26+5:302019-05-24T14:28:49+5:30

बुलडाणा : लोकसभा निवडणुकीत सलग तिसरा विजय मिळवत युतीेचे उमेदवार प्रतापराव जाधव यांनी बुलडाणा लोकसभेच्या इतिहासातील दुसरी विजयाची हॅट्रीक नोंदवली आहे.

Buldhana Lok Sabha Election 2019 winner: Prataprao Jadhav's victory hattrick | बुलडाणा लोकसभा निवडणूक निकाल 2019:  प्रतापराव जाधवांची विजयाची हॅट्रीक

बुलडाणा लोकसभा निवडणूक निकाल 2019:  प्रतापराव जाधवांची विजयाची हॅट्रीक

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

बुलडाणा : लोकसभा निवडणुकीत सलग तिसरा विजय मिळवत युतीेचे उमेदवार प्रतापराव जाधव यांनी बुलडाणा लोकसभेच्या इतिहासातील दुसरी विजयाची हॅट्रीक नोंदवली आहे. दरम्यान, १९९९ पासून शिवसेनाचा बालेकिल्ला राहलेला बुलडाणा लोकसभा मतदार संघ अभेद्य असल्याचे स्पष्ट झाले आहे. मतमोजणी दरम्यानच्या पहिल्या फेरीपासूनच आघाडी घेत ती शेवटच्या फेरीपर्यंत कायम ठेवण्याची किमया नवनिर्वाचित खासदार प्रतापराव जाधव यांनी साधली आहे. सलग तिसऱ्यांदा विजय मिळवितांना त्यांनी त्यांचे पारंपारिक व कट्टर प्रतिस्पर्धी आघाडीचे उमेदवार डॉ. राजेंद्र शिंगणे यांचा १ लाख ३३ हजार २८७ मतांनी पराभवत करत २००९ च्या इतिहासाची पुनरावृत्ती केली आहे.
दहा वर्षापूर्वी राजकीय-सामाजिक सहानुभूती तर २०१४ मध्ये मोदी लाटेत तरल्याची कायम टिका सहन करणाºया शिवसेनेचे प्रतापराव जाधव यांनी २०१९ च्या १७ व्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा मोठ्या मताधिक्याने पारंपारिक प्रतिस्पर्धी डॉ. राजेंद्र शिंगणे यांचा परभाव केला आहे.
सोबतच आपल्या राजकीय मुस्सदेगिरीचीही चुनूक या माध्यमातून दाखवून दिली आहे. अ‍ॅन्टी इनकम्बन्सीमध्ये यंदा प्रतापराव जाधव कितपत तरतात याबाबत राजकीय जाणकारांकडून शंका व्यक्त केल्या जात होत्या. मात्र प्रतापराव जाधवांनी सामाजिक समिकरणे सांभाळतांनाच राजकीय समिकरणाचीही घडी योग्य पद्धतीने बसवत हा विजय साकारला आहे. हा नुसताच विजय साकारला नाही तर बुलडाणा लोकसभेच्या इतिहासात ५० वर्षे अबाधीत राहिलेल्या काँग्रेसच्या श्रीराम यांनी केलेल्या विजयाच्या हॅट्रीकची बरोबरी साधली आहे. त्यामुळे त्यांचा हा विजय राजकीय दृष्ट्या बुलडाण्याच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद घेणारा ठरणारा आहे.
१९९९ पासून बुलडाणा लोकसभा मतदार संघात काँग्रेसची निर्माण झालेली मक्तेदारी मोडीत काढ शिवसेनेने संपूर्ण जिल्हा हा युतीचा बालेकिल्लाच करून टाकलेला आहे. त्यातच भाजपची गेल्या पाच वर्षात वाढलेली ताकदीच्या जोरावर भाजपचे तीन आमदार आणि शिवसेनेच्या दोन आमदारांमुळे जिल्ह्यात युतीचा दबदबा वाढला आहे.
खासदार प्रतापराव जाधव यांना पाच लाख २१ हजार ९७७ मते मिळाली तर त्यांचे पारंपारिक प्रतिस्पर्धी डॉ. राजेंद्र शिंगणे यांना तीन लाख ८८ हजार ६९० मते मिळाली. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार बळीराम सिरस्कार यांना एक लाख ७२ हजार ६२७ मते मिळाली. दरम्यान अन्य नऊ उमेदवारांना नोटापेक्षाही कमी मते मिळाली असून या उमेदवारांना त्यांची अनामत रक्कमही वाचविता आलेली नाही. वैध मतांच्या १/८ मतेही ते घेऊ न शकल्याने ही अनामत रक्कम ते वाचवू शकले नाही.

Web Title: Buldhana Lok Sabha Election 2019 winner: Prataprao Jadhav's victory hattrick

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.