बुलडाणा जिल्ह्यातील दीड हजार अंगणवाड्यांना स्वत:ची इमारत नाही!  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2018 05:03 PM2018-07-18T17:03:13+5:302018-07-18T17:04:14+5:30

१ हजार ५८१ अंगणवाड्यांना स्वत:ची इमारत नसून १ हजार ९६१ अंगणवाडीत पिण्याचे पाणी तर १ हजार ८५५ अंगणवाडीत शौचालय सुविधा नसल्यामुळे चिमुकल्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे.

Buldhana district's thirteen thousand anganwadis do not have their own building! | बुलडाणा जिल्ह्यातील दीड हजार अंगणवाड्यांना स्वत:ची इमारत नाही!  

बुलडाणा जिल्ह्यातील दीड हजार अंगणवाड्यांना स्वत:ची इमारत नाही!  

Next
ठळक मुद्दे महिला व बालविकास प्रकल्पाअंतर्गंत ग्रामीण भागात २ हजार ७१८ अंगणवाड्या कार्यरत आहेत.यातील बºयाचशा अंगणवाड्यांमध्ये मुलांना दिली जाणारी खेळणी, शिक्षण विषयक साहित्य दिसून येत नाही.१ हजार ९६१ अंगणवाड्यामध्ये पिण्याचा पाण्याची व १ हजार ८५५ अंगणवाड्यामध्ये शौचालय सुविधा उपलब्ध नाही.

- हर्षनंदन वाघ

बुलडाणा : ग्रामीण भागातील गोर- गरीब कुटुंबातील चिमुकल्यांना शिक्षणाची तोंड ओळख व्हावी, कुपोषण दूर व्हावे या उद्देशाने शासनाच्या महिला व बालकल्याण विभागाअंतर्गत जिल्ह्यातील ग्रामीण भागात २ हजार ७१८ अंगणवाड्या कार्यरत आहेत. मात्र, यातील १ हजार ५८१ अंगणवाड्यांना स्वत:ची इमारत नसून १ हजार ९६१ अंगणवाडीत पिण्याचे पाणी तर १ हजार ८५५ अंगणवाडीत शौचालय सुविधा नसल्यामुळे चिमुकल्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. मुलांना पूर्व प्राथमिक शिक्षणाची तोंडओळख व्हावी व त्यांच्यामध्ये शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी, ग्रामीण भाग कुपोषण मुक्त होण्यासाठी अंगणवाडी हा शैक्षणिक उपक्रम सरकारने सुरू केला. या उपक्रमाला आता पंचवीसहून अधिक वर्षे झाली आहेत. अंगणवाडीमुळे मुलांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण झाली, त्यामुळे प्राथमिक शिक्षणाचे प्रमाण वाढले, मात्र विविध सुविधा उपलब्ध होत नसल्यामुळे गेल्या काही वर्षात अंगणवाडीतील शिक्षणाचा दर्जा घसरला असल्याने दिसून येत आहे. बुलडाणा जिल्ह्यात शासनाच्या एकात्मिक बाल विकास प्रकल्पाअंतर्गंत शहरीभागात २५४ अंगणवाड्या कार्यरत आहेत. तर जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास प्रकल्पाअंतर्गंत ग्रामीण भागात २ हजार ७१८ अंगणवाड्या कार्यरत आहेत. त्यात २ हजार ५७७ मोठ्या व १४१ मिनी अंगणवाड्यांचा समावेश आहे. परंतु यातील बºयाचशा अंगणवाड्यांमध्ये मुलांना दिली जाणारी खेळणी, शिक्षण विषयक साहित्य दिसून येत नाही, तर काही अंगणवाड्या दूरवस्थेमुळे अंतिम घटका मोजत आहेत. त्यामुळे येथे मुलांना उभे राहायलाही जागा नाही. यामुळे ही अंगणवाडी ग्रामपंचायती परिसरात किंवा ओट्यावर किंवा कुणाच्या तरी घरी भरवावी लागत आहे. शहरी मुलांना नर्सरीसारखे पूर्वप्राथमिक शिक्षणासाठी पर्याय उपलब्ध आहेत. परंतु ग्रामीण भागातील मुलांसाठी नर्सरी नसल्याने व त्यांची आर्थिक कुवत नसल्यामुळे अशाप्रकारचे शिक्षण उपलब्ध होऊ शकत नाही. यासाठी ग्रामीण भागातील अंगणवाड्या वरदानच आहेत. परंतु निधी असूनही विविध अडचणीमुळे अंगणवाड्यांची सध्याची स्थिती विदारक आहे. त्यामुळे अंगणवाड्यातील चिमुकल्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे.

पिण्याचे पाणी व शौचालय सुविधा नाही

जिल्ह्यातील ग्रामीण भागात असलेल्या २ हजार ७१८ अंगणवाड्यापैकी १ हजार ९६१ अंगणवाड्यामध्ये पिण्याचा पाण्याची व १ हजार ८५५ अंगणवाड्यामध्ये शौचालय सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे चिमुकल्यांना त्रास सहन करावा लागतो. बुलडाणा तालुक्यातील २३१, चिखली २८७, देऊळगाव राजा १०३, सिंदखेड राजा १९५, लोणार १२८, मेहकर भाग १-१५४, मेहकर भाग २-१३१, मोताळा १४६, मलकापूर ७९, नांदूरा ५४, खामगाव ११६, शेगाव ११६, जळगाव जामोद १११ व संग्रामपूर तालुक्यातील ११० असे एकूण १ हजार ९६१ अंगणवाड्यांमध्ये पिण्याच्या पाण्याची सुविधा नाही. त्यामुळे चिमुकल्यांना घरूनच पाण्याची बॉटल भरून घेवून जावे लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

Web Title: Buldhana district's thirteen thousand anganwadis do not have their own building!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.