बुलडाणा जिल्ह्यात लाचखोरीत महसूल, पोलीस विभाग वरचढ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2018 12:29 AM2018-03-07T00:29:58+5:302018-03-07T00:29:58+5:30

बुलडाणा : शासकीय कार्यालयात अधिकारी व कर्मचाºयांचे खिसे भरल्याशिवाय कुठलीही कामे होत नाही, हे लाचखोरीच्या वाढत्या प्रमाणावरून स्पष्ट होत आहे. जिल्ह्यात वर्षभरामध्ये शासनाच्या विविध विभागात सापळा प्रकरणे  व अन्य भ्रष्टाचाराचे २० प्रकरणे समोर आली असून, लाचखोरीमध्ये महसूल व पोलीस विभाग वरचढ ठरत आहे.  

Buldhana district bribe revenue, police department top! | बुलडाणा जिल्ह्यात लाचखोरीत महसूल, पोलीस विभाग वरचढ!

बुलडाणा जिल्ह्यात लाचखोरीत महसूल, पोलीस विभाग वरचढ!

Next
ठळक मुद्देजिल्ह्यात २० लाचखोरीची प्रकरणे लाचखोरीचे प्रमाण वाढते

ब्रम्हानंद जाधव । 
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : शासकीय कार्यालयात अधिकारी व कर्मचाºयांचे खिसे भरल्याशिवाय कुठलीही कामे होत नाही, हे लाचखोरीच्या वाढत्या प्रमाणावरून स्पष्ट होत आहे. जिल्ह्यात वर्षभरामध्ये शासनाच्या विविध विभागात सापळा प्रकरणे  व अन्य भ्रष्टाचाराचे २० प्रकरणे समोर आली असून, लाचखोरीमध्ये महसूल व पोलीस विभाग वरचढ ठरत आहे.  
भ्रष्टाचाराला विरोध करण्यासाठी सामान्य नागरिक समोर येत असल्याने अधिकारी व कर्मचाºयांकडून लाच मागण्याचे प्रकरणही चव्हाट्यावर येत आहे. शासनाच्या ठरावीक काही विभागामध्ये कुठलेही काम अधिकाºयांचे खिसे गरम केल्याशिवाय होत नसल्याचा अनुभव काहींचा आहे. अशा लाचखोर अधिकाºयांचा पर्दाफाश करण्याचे काम लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून करण्यात येत आहे. जिल्ह्यात जानेवारी २०१७ पासून आतापर्यंत जवळपास २० गुन्हे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने समोर आणले आहेत. त्यामध्ये सापळा प्रकरणे अपसंपदा व अन्य भ्रष्टाचाराचे गुन्हे समोर आले आहेत. लाचलुचपत  प्रतिबंधक विभागाकडून लाचखोरांना रंगेहात पकडूनही लाचखोरीचे प्रमाण वाढतच आहे. सापळा प्रकरणांमध्ये सध्या महसूल व पोलीस विभाग आघाडीवर आहे. डिसेंबरमध्ये झालेल्या सापळा कारवाईमध्ये परिवहन महामंडळच्या बुलडाणा विभागीय कार्यालयाचे विभाग नियंत्रकच अडकल्याचा प्रकार समोर आला आहे. त्याचबरोबर वर्षभरात झालेल्या कारवाईमध्ये अनेक वर्ग एकच्या अधिकाºयांचाही समावेश दिसून येतो. 
सात-बारामध्ये वारसाचे नाव कमी करून त्यांच्या नावे हक्क देण्यासाठी निबंधक कार्यालयाच्या अधिकाºयाकडून लाच घेतल्याचा प्रकार समोर आला होता.  लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या या कारवाईमुळे लाच मागण्याच्या बाबतीत भ्रष्ट अधिकारी व कर्मचाºयांची लाचखोरी वाढतच असल्याचे दिसून येत आहे. 

लाचखोरांना शिक्षेचे प्रमाण २६ टक्के!
जिल्ह्यात लाचलुचपत प्रकरणात झालेल्या कारवायांमध्ये आरोपींना शिक्षा होण्याचे प्रमाण २६ टक्क्यांच्या जवळ पोहोचले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सुदर्शन मुंडे उपअधीक्षक असताना जिल्ह्यात लाचखोरांविरोधात धडक कारवाई सुरू झाली होती. त्यांचाच कित्ता वर्तमान उपअधीक्षक शैलेश जाधव गिरवत असून, लाचखोरांवर वचक निर्माण झाला आहे. 

बड्या अधिकाºयांवरही कारवाई
बुलडाणा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने संपत आलेल्या आर्थिक वर्षात धडक कारवाई करीत जिल्ह्यात बड्या अधिकाºयांनाही सोडले नाही. राज्य परिवहन महामंडळाचे विभाग नियंत्रक यांच्यावरही कारवाई करण्यात आली होती. यासोबतच मलकापूर, खामगाव, मेहकरसह अन्य ठिकाणी विभागाने सापळे यशस्वी करून आपल्या कामाची चुणूक दाखवली आहे. 

‘एसीबी’कडे आधुनिक यंत्रणा 
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून गुन्हे सिद्ध करण्याच्या दृष्टीने कारवाई करताना बारकाईने सापळा रचल्या जात आहे. त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचाही यंत्रणेकडून खुबीने वापर केला जात आहे. परिणामस्वरूप जिल्ह्यातील सापळे यशस्वी होत असल्याचे चित्र आहे. 
 

Web Title: Buldhana district bribe revenue, police department top!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.