बुलडाणा :  सार्वजनिक समितीकडून शिवजयंती उत्सवाची तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2018 12:33 AM2018-02-09T00:33:15+5:302018-02-09T00:33:52+5:30

बुलडाणा :  छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती वैचारिक प्रबोधनाने साजरी व्हावी, या उद्देशाने गेल्या दोन वर्षांपासून बुलडाण्यात सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीतर्फे शिवजयंती साजरी करण्यात येत आहे. यावर्षीसुद्धा  मोठय़ा उत्साहात जयंती साजरी करण्यात येणार आहे. त्यानुषंगाने  विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, सर्व पक्ष, संघटना, सामाजिक संस्था, युवक, विद्यार्थी तसेच शिवभक्तांनी सहभाग दर्शवावा, असे आवाहन सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्यावतीने करण्यात आले आहे. 

Buldana: Preparation of Shiv Jayanti festival by the Public Committee | बुलडाणा :  सार्वजनिक समितीकडून शिवजयंती उत्सवाची तयारी

बुलडाणा :  सार्वजनिक समितीकडून शिवजयंती उत्सवाची तयारी

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा :  छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती वैचारिक प्रबोधनाने साजरी व्हावी, या उद्देशाने गेल्या दोन वर्षांपासून बुलडाण्यात सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीतर्फे शिवजयंती साजरी करण्यात येत आहे. यावर्षीसुद्धा  मोठय़ा उत्साहात जयंती साजरी करण्यात येणार आहे. त्यानुषंगाने  विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, सर्व पक्ष, संघटना, सामाजिक संस्था, युवक, विद्यार्थी तसेच शिवभक्तांनी सहभाग दर्शवावा, असे आवाहन सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्यावतीने करण्यात आले आहे. 
यासंदर्भात गुरुवारी पत्रकार भवनामध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष डॉ. राजेश्‍वर उबरहंडे, सचिव सुनील सपकाळ आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान, १७ फेब्रुवारी  रोजी सायंकाळी गांधी भवनामध्ये प्रख्यात विचारवंत प्रा. डॉ. शिवरत्न शेटे यांचे व्याख्यान होईल. १८ फेब्रुवारी रोजी आंतरराष्ट्रीय शाहीर प्रसाद विभुते यांचा शाहिरी लोककलेचा कार्यक्रम व १९ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजतापासून जिजामाता स्टेडियममध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रम होतील. तसेच दुपारी ३ वाजता संगम चौकातून शोभायात्रा निघेल. शाळा-महाविद्यालयांमध्ये शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्रावर आधारित निबंध स्पर्धा, रांगोळी स्पर्धा आयोजित केली जाणार आहे. तीनही दिवसांच्या कार्यक्रमांना  उपस्थित राहून नागरिकांनी शिवजयंती उत्सवात सहभागी व्हावे, तथा हा उत्सव लोकोत्सव करावा, असे आवाहन समिती अध्यक्ष डॉ. राजेश्‍वर उबरहंडे सुनील सपकाळ, प्रा. डॉ. अनंत शिरसाट, प्रा. सदानंद माळी, राजेश हेलगे, प्रवर्तक रणजितसिंग राजपूत, सुरेश देवकर, राहुल सपकाळ यांनी केले. यावेळी माजी आ. विजयराज शिंदे, जि. प. सदस्य  जयश्री शेळके, बारा बलुतेदार संघाचे राज्य उपाध्यक्ष दामोधर बिडवे, शाहिना पठाण आदी उपस्थित होते.

शहर स्वच्छता मोहीम राबविणार!
यावर्षी उत्सव समितीने संपूर्ण बुलडाणा शहरात स्वच्छता मोहीम राबविण्याचे ठरविले आहे. १७ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ वाजता नियोजित छत्रपती शिवाजी महाराज स्मारक ठिकाणावरून स्वच्छता मोहिमेला प्रारंभ करण्यात येईल. मोहिमेसाठी जिल्हा प्रशासन, नगर प्रशासन, बुलडाणा अर्बन परिवार यांचे सहकार्य लाभणार आहे.

Web Title: Buldana: Preparation of Shiv Jayanti festival by the Public Committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.