बुलडाणा : व्याख्यानांच्या माध्यमातून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांना उजाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 02:55 PM2017-12-11T14:55:18+5:302017-12-11T14:57:16+5:30

बुलडाणा : गांधी भवन बुलडाणा येथे १० डिसेंबर रोजी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात व्याख्यानांच्या माध्यमातून तुकडोजी महाराजांच्या विचारांना उजाळा देण्यात आला.

Buldana: Describe the views of Rashtrasant Tukdoji Maharaj through lectures | बुलडाणा : व्याख्यानांच्या माध्यमातून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांना उजाळा

बुलडाणा : व्याख्यानांच्या माध्यमातून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांना उजाळा

Next
ठळक मुद्देराष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाच्या सुरूवातीला सकाळी ९.३० ते ११ पर्यंत ग्रामगितेची दिंडी शोभायात्रा.

बुलडाणा : गांधी भवन बुलडाणा येथे १० डिसेंबर रोजी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात व्याख्यानांच्या माध्यमातून तुकडोजी महाराजांच्या विचारांना उजाळा देण्यात आला.
कार्यक्रमाच्या सुरूवातीला सकाळी ९.३० ते ११ पर्यंत ग्रामगितेची दिंडी शोभायात्रा जयस्तंभ चौक, स्टेट बँक चौक, तहसिल चौक, शिवालय चौक, संगम चौक मार्गाने काढून गांधी भवन येथे आली. दिंडीचे उद्घाटन जिल्हा प्रचारक दीपक महाराज सावळे, के.एस.वाकोडे, गंजीधर पाटील, प्रमोद दांडगे, शाहीर हरिदास खांडेभराड, निवृत्ती घोंगटे यांचे नेतृत्वात झाली. दिंडीमध्ये हतेडी बु., हतेडी खु., केसापूर, आंभोडा, चिखला, रायपूर, सातगाव, खेर्डी, किन्होळा, डों.खंडाळा आदी गावातील भजनी दिंड्यांनी सहभाग घेतला होता. डॉ.उध्दवराव गाडेकर, निवृत्ती घोंगटे, दिदा पाटील, ग्रामगीता अभ्यासक भगवान राईतकर,
हटकर, गव्हाणे, के.एस.वाकोडे, दीपक महाराज सावळे, गंजीधर गाढे यांची प्रमुख उपस्थिती होती. गाडेकर, भगवान राईतकर, हटकर, दीपक महाराज आदींनी
यावेळी मार्गदर्शन केले. दुपारच्या सत्रामध्ये नवरत्न पुरस्कार सोहळा संपन्न झाला. वासुदेव देशपांडे, शिवनारायण पोफळकर, जगदेव पवार, अरूण
जाधव, शाम सावळे, प्रा.किशोर जाधव, जोशीताई, प्रतिभा भुतेकर, अतुल जोशी, प्रा.घेवंदे, शैलेश काकडे, उत्तम बुरकुल, पवन जाधव, गंजीधर गाढे, सवडतकर,प्रशांत आढाव, डॉ.बाहेती, विलास वानखेडे, रागेश वानखेडे, श्रीराम खेडकर,
प्रमोद दांडगे, दीपक सावळे शाहीर हरिदास खांडेभराड यांचा सन्मानपत्र, स्मृतीचिन्ह शाल देवून सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे  संचालन शाहीर
हरिदास खांडेभराड यांनी तर प्रास्ताविक गंजीधर गाढे यांनी केले. आभार प्रदर्शन दीपक महाराज सावळे यांनी केले. कार्यक्रमाला गुरूदेव सेवा
मंडळाचे तालुका व जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते हजर होते. कार्यक्रमासाठी गणेश डोईफोडे, अजय बोहरा, काशिराम निकम, मोतीराम निकम, गजानन तरमळे, नंदु कानडजे, शालीकराम कानडजे, सदाशिव बाहेकर, मधुकर बोरपी,
मंगलसिंग राठोड, दळवी, शिरीष तायडे, बापु सुरडकर, समाधान जंजाळ, भारूडकार झगरे आदींनी सहकार्य केले. राष्टÑवंदना व मौन श्रध्दांजलीने कार्यक्रमाचा समारोप  झाला.

Web Title: Buldana: Describe the views of Rashtrasant Tukdoji Maharaj through lectures

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.