भाजपवाल्यांना सत्तेचा माज चढला - बच्चू कडू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2017 12:33 AM2017-08-21T00:33:33+5:302017-08-21T00:39:09+5:30

शेगाव:  भंगारमध्ये जमा झालेले सर्व नेते एकत्र येऊन सुकाणू  समिती तयार करण्यात आली, अशा शब्दात कृषिमंत्री पांडुरंग  फुंडकर यांनी सुकाणू समितीवर ताशेरे ओढले त्यामुळे भाज पवाल्यांना सत्तेचा माज चढलेला आहे, अशा शब्दात सुकाणू  समितीचे सदस्य तथा आमदार बच्चू कडू यांनी शेगावात हल्ला  चढविला.

BJP's power to power - Bachu Kadu | भाजपवाल्यांना सत्तेचा माज चढला - बच्चू कडू

भाजपवाल्यांना सत्तेचा माज चढला - बच्चू कडू

Next
ठळक मुद्देसुकाणू  समितीचे सदस्य तथा आमदार बच्चू कडू यांनी शेगावात हल्ला  चढविलासातव्या वेतन आयोगापेक्षा कर्जमाफी द्या! 

लोकमत न्यूज नेटवर्क
शेगाव:  भंगारमध्ये जमा झालेले सर्व नेते एकत्र येऊन सुकाणू  समिती तयार करण्यात आली, अशा शब्दात कृषिमंत्री पांडुरंग  फुंडकर यांनी सुकाणू समितीवर ताशेरे ओढले त्यामुळे भाज पवाल्यांना सत्तेचा माज चढलेला आहे, अशा शब्दात सुकाणू  समितीचे सदस्य तथा आमदार बच्चू कडू यांनी शेगावात हल्ला  चढविला.
शनिवारी कृषिमंत्री ना. भाऊसाहेब फुंडकर यांनी भाजपा  किसान आघाडीच्या शेतकरी मेळाव्यात चिखली येथे सुकाणू समि तीचा खरपूस समाचार घेतला. ते म्हणाले की,  आंदोलनवेळी   सुकाणू समितीने शेतकर्‍यांचा माल रस्त्यावर टाकला त्यामुळे  त्यांची एकप्रकारे लूटच करण्यात आली, तर स्वातंत्र्यदिनी  पालकमंत्र्यांना ध्वजारोहणापासून रोखणे हा देशद्रोहाचा गुन्हाच  आहे. कायदा का यांच्या घरचा आहे का, असा प्रश्नही त्यांनी  यावेळी केला. यावर रविवारी सुकाणू समितीचे सदस्य तथा  आमदार बच्चू कडू यांनी पत्रकारांशी बोलताना शेगावात हल्ला  चढविला. ते म्हणाले की, भाजपावाल्यांना सत्तेचा अहंकार व  सत्तेची मस्ती आहे. शेतकर्‍यांबाबत फुंडकरांना कवडीचेही ज्ञान  नाही. शेतकर्‍यांचे ठिबकाचे अनुदान दोन वर्षांपासून दिलेले नाही.  दोनशे रुपये सोयाबीनचे अजून भेटले नाही. तूर अजूनही  लोकांच्या घरात पडलेली आहे. तेव्हा कोठे गेली होती तुमची  र्मदानगी? आम्हाला  देशद्रोही म्हणणार्‍या फुंडकरांनी हिंमत असेल  तर राजीनामा देऊन यावे. आपण दोघेही देशाच्या सीमेवर जाऊन  तेथे दाखवू देशभक्ती काय असते ती. आम्हाला भंगार म्हणणारे  फुंडकर हे मोदींच्या ताकदीवर निवडून आले. असली र्मद असाल  तर बगर कमळाचे या मैदानात, असे आव्हानही त्यांनी दिले. या  संदर्भात भाऊसाहेब फुंडकर यांच्याशी संपर्क साधला असता तो  होवू शकला नाही. 

सातव्या वेतन आयोगापेक्षा कर्जमाफी द्या! 
नांदुरा: शासकीय कर्मचार्‍यांना सातवा वेतन आयोग  विलंबाने  दिला तर एकही शासकीय कर्मचारी आत्महत्या करणार नाही; मात्र  शासनाच्या फसव्या कर्जमाफीमुळे शेतकरी आत्महत्या वाढल्या  असून, शासनाने आधी सरसकट कर्जमाफी द्यावी व नंतर सातवा  वेतन आयोग लागू करावा, असे प्रतिपादन अचलपूर मतदारसंघाचे  आमदार बच्चू कडू यांनी २0 ऑगस्ट रोजी येथे केले. शहरातील  शेतकरी पुत्र अभ्यासिकेत विद्यार्थ्यांसोबत संवाद साधताना ते बोल त होते. प्रहार संघटनेचे बच्चू कडू हे नांदुरा तालुक्यातील बेलुरा ये थील सभेसाठी जात असताना कृउबास संचालक राजेश गावंडे  यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीद्वारा संचालित शेतकरी पुत्र  अभ्यासिकेला भेट देऊन विद्यार्थ्यांसोबत संवाद साधण्याची विनंती  केली होती. त्यानुसार आमदार बच्चू कडू यांनी तासभर विद्या र्थ्यांंसोबत संवाद साधला. यावेळी बाजार समितीचे संचालक मोहन  पाटील, संतोष मुंडे, अनिल इंगळे, राजेश गावंडे व प्रभारी सचिव  वा. म. भोंगे आदींची उपस्थिती होती.  

Web Title: BJP's power to power - Bachu Kadu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.