कोरेगाव भीमा येथील दंगलीत भाजपचा हात - रविकांत तुपकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2018 12:53 AM2018-01-04T00:53:44+5:302018-01-04T00:54:02+5:30

कोरेगाव भीमा येथे घडलेली दंगल ही पूर्वनियोजित व भाजपने घडवून आणलेली असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्याचे नेते तथा वस्त्रोद्योग महामंडळाचे माजी अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी केला; तसेच झालेल्या घटनेचा निषेध करून त्यांनी शांतता राखण्याचे आवाहनदेखील केले. 

BJP's hand in riots in Koregaon Bhima - Ravikanth Tupkar | कोरेगाव भीमा येथील दंगलीत भाजपचा हात - रविकांत तुपकर

कोरेगाव भीमा येथील दंगलीत भाजपचा हात - रविकांत तुपकर

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : कोरेगाव भीमा येथील ऐतिहासिक घटनेला २00 वर्षे पूर्ण झाल्याच्या पृष्ठभूमीवर हा विजयी उत्सव साजरा करण्यासाठी कोरेगाव भीमाला लाखोच्या संख्येने समाजबांधव येणार होते. याची कल्पना सरकारला असायला हवी होती, नसेल तर सरकारची गुप्तचर यंत्रणा काय करते? पोलीस यंत्रणेला जर माहीत असेल तर सरकारने बघ्याची भूमिका का घेतली? असा प्रश्न उपस्थित करून कोरेगाव भीमा येथे घडलेली दंगल ही पूर्वनियोजित व भाजपने घडवून आणलेली असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्याचे नेते तथा वस्त्रोद्योग महामंडळाचे माजी अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी केला; तसेच झालेल्या घटनेचा निषेध करून त्यांनी शांतता राखण्याचे आवाहनदेखील केले. 
याबाबत तुपकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, भाजप सरकारने निवडणुकीत जनतेला अनेक आश्‍वासने दिली होती; मात्र सत्तेवर येऊन या सरकारला चार वर्षे होत आली, तरीही आश्‍वासनांची पूर्तता झालेली नाही. सामान्य जनता सरकार विरोधात उघडपणे बोलत आहे, त्यामुळे मुख्य प्रश्नांपासून जनतेचे लक्ष विचलीत करण्यासाठी गावागावांत जातीयवाद निर्माण करून भांडणे लावणे, ही भाजप सरकारची जुनीच खेळी आहे. वास्तविक गावागावांत दलित व मराठा समाजाचे नागरिक गुण्या-गोविंदाने नांदतात. या दोन समाजात भांडणे लावून राजकीय पोळी भाजण्याचा सरकारचा डाव आहे. २0१९ च्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मतांचे धृव्रिकरण करून राजकीय फायदा मिळवायचा, हा डाव भाजपचा आहे, हे आता जनतेने वेळीच ओळखले पाहिजे.  कोरेगाव भीमाचा खरा इतिहास खोडून काढून, बहुजनांच्या मुलांच्या हाती तलवारी देऊन, त्यांची माथी भडकावून भांडणे लावायची आणि याची सूत्रे मात्र आपल्या हातात ठेवायची, ही भाजप व त्यांच्या पिलावळांची नीती ओळखून मराठा व दलित समाजातील तरुणांनी जागरुक झाले पाहिजे. देशांतर्गत जातीय दंगली घडवणे हे भाजप सरकारचे विखारी षड्यंत्र आहे. भविष्यात आपआपसात भांडणे करून आपलेच रक्त सांडण्याऐवजी बहुजन समाजातील तरुणांनी एकत्र येऊन नव्याने निर्माण झालेल्या प्रस्थापित पेशवाई विरुद्ध संघर्ष उभा करावा, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्याचे नेते रविकांत तुपकर यांनी केले. शेवटी जनतेने झालेल्या घटनेचा शांततेच्या मार्गाने निषेध करावा, असे आवाहनही त्यांनी केले.       

Web Title: BJP's hand in riots in Koregaon Bhima - Ravikanth Tupkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.