बसच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2019 01:46 PM2019-07-08T13:46:11+5:302019-07-08T13:48:12+5:30

बसने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना सोमवारी सकाळी घडली.

Bike rider killed in bus accident | बसच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

बसच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

googlenewsNext
ठळक मुद्देविक्की मोरे असे मृतक युवकाचे नाव आहे. अकोलाकडे जाणाºया बसने मोटारसायकलला जबर धडक दिली. ग्रामीण पोलीस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.


खामगाव : बसने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना सोमवारी सकाळी १०.४५ वाजता खामगाव ते अकोला राष्ट्रीय महामार्गावर एका हॉटेलसमोर घडली. विक्की मोरे असे मृतक युवकाचे नाव आहे. 
खामगाव येथून अकोलाकडे जाणाºया बसने समोरील विना क्रमांकाच्या मोटारसायकलला जबर धडक दिली. यात दुचाकीस्वार जागीच ठार झाला. विक्की मोरे असे मृतक युवकाचे नाव असून तो टेंभूर्णा येथील रहिवाशी असल्याची माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच, ग्रामीण पोलीस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह सामान्य रूग्णालयात आणण्यात आला. (प्रतिनिधी)

Web Title: Bike rider killed in bus accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.