भाऊसाहेब फुंडकरांना सत्तेचा माज चढला, बच्चू कडूंचा भाजपावर प्रहार  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2017 09:23 PM2017-08-20T21:23:39+5:302017-08-20T21:23:43+5:30

शेगाव, दि. 20 - भंगारमध्ये जमा झालेले सर्व नेते एकत्र येऊन सुकाणू समिती तयार करण्यात आली, अशा शब्दांत कृषिमंत्री पांडुरंग ...

Bhausaheb Phundkar's power over power | भाऊसाहेब फुंडकरांना सत्तेचा माज चढला, बच्चू कडूंचा भाजपावर प्रहार  

भाऊसाहेब फुंडकरांना सत्तेचा माज चढला, बच्चू कडूंचा भाजपावर प्रहार  

googlenewsNext

शेगाव, दि. 20 - भंगारमध्ये जमा झालेले सर्व नेते एकत्र येऊन सुकाणू समिती तयार करण्यात आली, अशा शब्दांत कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी सुकाणू समितिवर ताशेरे ओढले. त्यावर फुंडकरांना सत्तेचा माज चढलेला असल्याचे वक्तव्य करून सुकाणू समितीचे सदस्य तथा आमदार बच्चू कडू यांनी शेगावात प्रतिहल्ला केला. शनिवारी कृषी मंत्री भाऊसाहेब फुंडकर यांनी भाजपा किसान आघाडीच्या शेतकरी मेळाव्यात चिखली येथे सुकाणू समितीचा खरपूस समाचार घेतला. ते म्हणाले की आंदोलनवेळी  सुकाणू समितिने शेतकऱ्यांचा माल रस्त्यावर टाकला त्यामुळे त्याची एकप्रकारे लुटच करण्यात आली. तर स्वतंत्र्य दिनी पालकमंत्र्यांना ध्वजारोहणपासून रोखणे हा देशद्रोहाचा गुन्हाच आहे. कायदा का यांच्या घरचा आहे का?  असा प्रश्नही त्यांनी यावेळी केला. यावर रविवारी सुकाणू समितीचे सदस्य तथा आमदार बच्चू कडू यांनी पत्रकारांशी बोलताना शेगावात फुंडकरांवर आरोप केले.  ते म्हणाले कि, भाजपावाल्यांना सत्तेचा अहंकार व सत्तेची मस्ती आहे. शेतकऱ्यांबाबत फूंडकरांना कवडीचेही ज्ञान नाही. शेतकऱ्यांचा ठिंबकचा अनुदान दोन वर्षांपासून दिलेले नाही. दोनशे रुपये सोयाबीनचे अजून भेटले नाही. तू अजूनही लोकांच्या घरात पडलेली आहे. तेंव्हा कोठे गेली होती तुमची मर्दानगी ? आम्हाला देशद्रोही म्हणणाऱ्या फुंडकरांनी हिम्मत असेल तर राजीनामा देऊन या आपण दोघेही देशाच्या सीमेवर जाऊन तेथे दाखवू देशभक्ती काय असते,  आम्हाला भंगार म्हणणारे फुंडकर हे मोदींच्या ताकदीवर निवडून आले. असली मर्द असाल तर विना कमळाचं मैदानात उतरा, तुम्हाला तुमची किंमत कळेल, असेही ते म्हणाले.

{{{{dailymotion_video_id####x845a4h}}}}

Web Title: Bhausaheb Phundkar's power over power

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.