शालेय क्रिकेट स्पर्धेत ‘भारत’चा संघ राज्यस्तरावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2018 06:18 PM2018-10-23T18:18:22+5:302018-10-23T18:18:59+5:30

 बुलडाणा: अमरावती विभागातील शालेय क्रिकेटमध्ये दबदबा निर्माण करणाऱ्या येथील भारत विद्यालयाच्या संघाने अमरावती येथे झालेल्या विभागीय शालेय क्रिकेट स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावत राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्रता सिद्ध केली आहे.

Bharat school team in cricket tournament | शालेय क्रिकेट स्पर्धेत ‘भारत’चा संघ राज्यस्तरावर

शालेय क्रिकेट स्पर्धेत ‘भारत’चा संघ राज्यस्तरावर

googlenewsNext

 बुलडाणा: अमरावती विभागातील शालेय क्रिकेटमध्ये दबदबा निर्माण करणाऱ्या येथील भारत विद्यालयाच्या संघाने अमरावती येथे झालेल्या विभागीय शालेय क्रिकेट स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावत राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्रता सिद्ध केली आहे. दरम्यान, राज्यस्तरावर खेळणारा हा भारत विद्यालयाचा ३२ वा संघ असून एकट्या क्रिकेट खेळामध्ये १९ वर्षात ५०० खेळाडू राज्यस्तरावर खेळण्याचा एक अनोखा विक्रम भारत विद्यालयाने केला आहे. दरमयान, दर्जेदार क्रिकेटमूळ भारत विद्यालयाचे ५० खेळाडू गेल्या १९ वर्षात राष्ट्रीयस्तरावर क्रिकेट खेळले असून भारत विद्यालयाच्याच डावखुरा वेगवान गोलंदात श्रीकांत वाघ याने इंग्लंडमध्ये व्यावसायिक क्रिकेटपटू म्हणून स्थानिक कॉऊंटी क्रिकेटमध्ये खेळतांना एकाच डावात दहा गडी बाद करण्याचा विक्रम गेल्या उन्हाळ््यात केला होता. त्यावरून येथील दर्जेदार क्रिकेटची कल्पना यावी. दुसरीकडे नुकत्याच अमरावती येथे पार पडलेल्या १७ वषार्खालील शालेय विभागस्तर क्रिकेट स्पर्धेत भारत विद्यालयाच्या संघटाने उत्कृष्ठ खेळ करत यवतमाळ, अकोला व अमरावती संघांना पराभूत करीत विभागीय स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावले आहे. सोबतच राज्यस्तरावर प्रतिनिधीध्व आता हा संघ करणार आहे. राज्यस्तरावर जाणारा हा भारत विद्यालयाचा ३२ वा संघ आहे. विभागीय स्पर्धेतील विजयामुळे क्रिकेट या एकाच खेळात ५०० खेळाडु राज्यस्तरावर खेळण्याचा विक्रम भारत विद्यालयाने आपल्या नावावर केला आहे. याबद्दल अमरावती येथे क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांनी या संघाचे मार्गदर्शक संजय देवल व सर्व खेळाडुंचा विशेष सत्कार केला. खेळाडूंच्या या यशाबद्दल भारत विद्यालयाचे अध्यक्ष हर्षवर्धन आगाशे, प्राचार्य एस. आर. उन्हाळे, तसेच बुलडाणा क्रीडा अधिकारी शेखर पाटील व सहकार्यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले आहे. यंदाच्या विभागीय स्पर्धेतील विजेता संघ पुढील महिन्यात पालघर येथे होणार्या राज्यस्तरीय स्पर्धेत अमरावती विभागाचे प्रतिनिधीत्व करणार आहे. या संघामध्ये अथर्व किन्हीकर हा कर्णधार असून, तुषार वाघ हा उपकर्णधार आहे. संघात यष्टीरक्षक म्हणून यश गवई, रितेश तांगडे, अनुराग गवई, अभिषेक चव्हाण, अमेय देवल, वरुण मुठ्ठे, आनंद भोंडे, ऋषीकेश राजपुत, सत्यजीत महामुनी, विशाल चवरे, तुषार खराटे, प्रतिक इंगळे, अजिंक्य काळवाघे, अभिषेक तायडे या खेळाडूंचा समावेश आहे. या खेळाडूंना संजय देवल, अक्षय चौधरी, वैभव सोनुने, रामकृष्ण भराड, अमोल लहासे हे मार्गदर्शन करती आहेत.

‘भारत’ राज्यस्तरावर दोनदा अजिंक्य

भारत विद्यालयाच्या संघाने आतापर्यंत दोनवेळा राज्यस्तरीय अजिंक्यपद प्राप्त केले असून सात वेळा उपविजेतेपद व पाच वेळा तृतीयस्थान प्राप्त केले आहे. याद्वारे ५० राष्ट्रीय खेळाडु देखील भारतने क्रिकेट स्पर्धेत दिले आहेत. दरम्यान, १९९९ पासून भारत विद्यालयाने शालेय क्रिकेट स्पर्धेत दबदबा निर्माण केला असून तो आजतागायत कायम आहे. श्रीकांत वाघ, अमोल जुनगडे, अमोल उबरहंडे, विक्रांत गुळवे, संदेश पाटील, अभिषेक पालकर, उदय इंगळे, शशांक अग्रवाल, रोहित पवार आदित्य देवल असे अनेक गुणवान खेळाडू शालेय क्रिकेटमधून दिले आहेत. यातील रोहित पवार, आदित्य देवल हे सलग सहा वेळा राज्यस्तरावर खेळलेले आहेत.

Web Title: Bharat school team in cricket tournament

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.