खामगाव तालुक्यात पेरणीची लगबग!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2019 02:31 PM2019-06-25T14:31:17+5:302019-06-25T14:31:23+5:30

पेरणी योग्य पाऊस झाल्याने खामगाव तालुक्यासह परिसरातील शेतकरी पेरणीच्या कामाला लागला.

Beginning of sowing in Khamgaon taluka! | खामगाव तालुक्यात पेरणीची लगबग!

खामगाव तालुक्यात पेरणीची लगबग!

googlenewsNext


लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : रोहिणी पाठोपाठ मृग नक्षत्रही कोरडे गेले. त्यामुळे तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांच्या पेरणी लांबणीवर पडल्या. अशातच शनिवारी आद्रा नक्षत्राच्या सुरूवातीलाच जोरदार पाऊस बरसला. पेरणी योग्य पाऊस झाल्याने खामगाव तालुक्यासह परिसरातील शेतकरी पेरणीच्या कामाला लागला. रविवारी आणि सोमवारी पाऊस झालेल्या भागात शेतकऱ्यांनी पेरणी केली.
शेतीची मशागत पूर्ण करून ठेवल्यानंतर शेतकºयांना पावसाची प्रतीक्षा होती. होती सुरूवातीचे दोन नक्षत्र पावसाने हुलकावणी दिली. त्यामुळे या परिसरातील शेतकरी चांगलाच हवालदिल झाला होता. पावसासाठी प्रतीक्षा सुरू असतानाच, शनिवारी खामगाव तालुक्यातील काही गावांमध्ये पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे शेलोडी, प्रिंपाळा या परिसरातील नाले तुडंूब वाहीले. तर काही शेतातही पाणी साचले. त्यामुळे या भागातील शेतकºयांनी लागलीच रविवारी पेरणी केली.
खामगाव आणि परिसरात पेरणी योग्य झालेल्या पावसाने रविवारी आणि सोमवारी दोन दिवस पेरणी केली. तर पावसाचे वेध घेवून काही शेतकºयांनी शुक्रवारीच धूळ पेरणी आटोपली. काही शेतकºयांनी शनिवारी सकाळी धूळ पेरणी केली. या शेतकºयांची धूळ पेरणी साधली असून, आता पावसाने दडी मारता कामा नये, अशी प्रार्थना तालुक्यातील शेतकरी करीत आहेत.
भालेगाव बाजार, ढोरपगाव आणि रोहणा, काळेगाव परिसरात रविवारी सायंकाळी पाऊस झाला. या भागातील शेतकºयांनी सोमवारी पेरणीला प्राधान्य दिले. अनेक शेतकºयांना पेरणीसाठी मजूर न मिळाल्याने काही शेतकºयांच्या पेरणी लांबणीवर पडली आहे.
(प्रतिनिधी)


बोरी अडगाव परिसरात पेरणीला सुरुवात
बोरी अडगाव: परिसरात अखेर शनिवार २२ जून रोजी चांगलाच पाऊस बरसला. त्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण असून बोरी अडगाव परिसरातील शेतकºयांनी रविवारी आणि सोमवारी पेरणी साधली आहे. एकाचवेळी पेरणी आल्याने मजूर मिळनाशे झाले. त्यामुळे काही शेतकºयांनी चक्क ट्रॅक्टरच्या साहाय्याने पेरणी केली. दरम्यान, बोरी अडगाव परिसरातील अनेक शेतकºयांना अद्यापपर्यंत दुष्काळी मदत मिळाली नाही. उर्वरित भाग १ अटाळी भाग २ अटाळी अडगाव तथा परिसरात दुष्काळी मदत योजनेचे काम अत्यंत धीम्या गतीने आहे या संदर्भात तलाठ्याकडे सर्व शेतकºयांचे बँक खाते नंबर असतानाही वारंवार पुन्हा खाते नंबर मागविण्यात येत आहेत. त्यामुळे या शेतकरी त्रस्त झाला आहे. आता पावसाने शेतकºयांना दिलासा दिला असून, चांगल्या पावसासाठी शेतकरी प्रार्थना करीत आहेत.

Web Title: Beginning of sowing in Khamgaon taluka!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.